मला वाटते

दिंनाक: 16 Mar 2019 17:52:43
 


मला वाटते पंख मिळावे
पक्ष्यापरी मी नभी उडावे!
झाडावरती इवले इवले
उंच उंच खोपे बांधावे!
वार्‍याने मग अलगद यावे
मंद मंद झोेके घ्यावे!
सुर मारूनी इंद्रधनुचे
सप्तरंग खुडूनी घ्यावे!
झुळझुळणार्‍या ओढ्यासंगे
रुणझुणणारे गाणे गावे!
- प्रेरणा संजय भोसलेे
7वी,स्कंदगुप्त
आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालय