देवा माझं ऐक

दिंनाक: 15 Mar 2019 16:09:41

आई म्हणते देवा माझं ऐक
माझ्या बाळाला बुद्धीचा अंश दे
देशासाठी वीर कर्म करण्याची क्षमता
माझ्या बाळाला अंगी बाणऊ दे
 
शिक्षक म्हणतात देवा माझं ऐक
माझ्या विद्यार्थ्यांना सक्षमता दे 
राष्ट्रासाठी एक व्यक्तिमत्व घडू दे 
माझ्या विद्यार्थ्यांत एक तर आझाद घडू दे
 
निसर्ग म्हणाला देवा माझं ऐक
या मानवाला एवढं कळू दे 
माझ्यावरचे अत्याचार थांबू दे
माझ्याही लता पल्लवींना
मोकळा श्‍वास घेऊ दे
मोकळा श्‍वास घेऊ दे
- अश्‍विनी गिरीष बडवे, 7वी, ब
म.ए.सो. रेणावीकर विद्यामंदिर