गणिताचे आकडे

दिंनाक: 14 Mar 2019 15:58:00

गणिताचे आकडे 
एकदा झाले वाकडे
एकला फुटले डोके
दोन म्हणाला ओ.के.
तीनचा वेगळा थाट
चारच्या पोटात गाठ
पाचला फुटलाय पाय
सहाला उंचीच नाय
सातची कुबडी पाठ 
आठचा आडवा घाट
नऊचा डोळा डोक्यावर
दहाचा सर्वांवर जोर
- पार्थ प्रशांत डुड्डू
7वी, निलगिरी