माझी एक मांजर,
तिचे नाव किटी
तिच्या बर्थडेची 
केली आम्ही पार्टी
काऊ आला, चिऊ आली
आला होता मिठू
त्या सगळ्यांना आम्ही
गोड खाऊ वाटू.
आता आली गाय.
तिचं गिफ्ट काय?
तिने दिली किटीला
दूधावरची साय.
नाचत नाचत मोर आला,
त्याने उंदीर गिफ्ट दिला.
म्हणाला,‘गिफ्ट खास,
खाऊन टाक त्यास.’
नंतर आले बदक भाऊ
त्यांनी आणला गोड खाऊ
ते म्हणाले किटीला,
‘खाऊन टाक नको भिऊ.’
मग आले कबुतर
त्याचे गिफ्ट पहा तर
ते म्हणाले किटीला,
‘तुझ्यासाठी छान पर्स.’
आता आली किटीची आई,
मग आले बाबा.
ते म्हणाले घाईने,
‘लवकर केक कापा.’
आता झाली रात्र,
संपली बर्थडे पार्टी.
सगळे एका सुरात म्हणाले,
‘हॅपी बर्थडे किटी.’
मी काढला सगळ्यांचा,
एक छान फोटो.
फ्रेम करून लावला खोलीत,
प्रत्येक जण बघतो...!!
राधिका पटवे (6वी, अ)
रेणाविकर विद्यामंदिर