एक होतं

दिंनाक: 12 Mar 2019 15:11:45

एक होतं प्रश्‍नचिन्ह
त्याने चष्मा लावला,
तरीसुद्धा उत्तराचा
पत्ता नाही गावला!
 
एक होतं माकड 
ते पुस्तक वाचून उठलं
माणूस आपला पूर्वज
हे त्याला नक्की पटलं!
 
एक होतं वांगं
ते होतं उपास करीत
त्याने चक्क उपासाला 
खाल्लं आपलंच भरीत!
 
- अभय मनोहर कदम
म.ए.सो. मुलांचे हायस्कूल