जीवन

दिंनाक: 11 Mar 2019 14:46:13


 
फुलासारखे जीवनाचे काटे काही असतात,
अवघड, खडतर वळणांवर नेहमी बोचत राहतात
 
काही तरी मिळवल्यावर थोडे गमवावे लागतेच,
आयुष्याच्या वळणावर रूसणे फुगणे असतेच
 
जेवढे कराल तेवढे सोपे, नाकाराल तेवढे अवघड,
महत्त्वाची असते ती जीवनाची जडणघडण
 
समजून घेता एवढे जीवन होते सोपे,
वृक्षसुद्धा पहिल्यांदा असतात ना छोटी रोपे
- अनुजा अजय देशपांडे
रेणावीकर माध्यमिक विद्यालय