हरवले सर्व काही

दिंनाक: 10 Mar 2019 15:04:14


 

कुठे शोधावी ती वनराई

जी शीतल छाया देई

कुठे शोधावा तो चिवचिवाट

जो कानी येई होताच पहाट

कुठे शोधावे ते कवडसे

कुठे झाले बरे दिसेनासे

कुठे शोधावा तो सुगंध

जो कळ्या उमलता करी मन धुंद

कशी म्हणू आवडते वळणाची वाट

माखली जी काळ्याकुट्ट सडकांनी दाट

वाढले जंगल सिमेंटचे

फोटोच पहावे लागणार प्राण्यांचे

घुसमटतोय जीव या गदारोळात

अडकलोय जणू कुण्या बोळात.

-    रसुला दांडेकर

इ. १२वी, कनिष्ठ महाविद्यालय, विक्रमगड