टिश्यू पेपरचे फूल

साहित्य :

1) टिश्यू पेपर, 2) दोरा/रबर बँड, 3) कात्री

कृती :

1) कोणत्याही रंगाचा टिश्यू पेपर घेऊन त्याचे चौकोन कापा. खालील फोटोमध्ये 4 इंच x 4 इंचाचे 10 चौकोन घेतले आहेत. (फोटो 1)

2) कापलेले चौकोन एकावर एक ठेवा. त्यांना आलटून पालटून दुमडा व मध्यभागी दोरा/रबर बँड लावा. (फोटो 2-3)

3) दुमडलेल्या टिश्यू पेपरला दोन्ही बाजूंनी गोलसर कापा. यामुळे फुलाला गोलसर पाकळ्यांचा आकार येईल. (फोटो 4)

4) रबर बँडच्या दोन्ही बाजूने टिश्यू पेपरचा एक एक पदर हळुवारपणे वरच्या दिशेने उलगडा. यामुळे टिश्यू पेपरला फुलाचा आकार येईल. (फोटो 5-8)

5) या फुलाला बारीक काडी चिकटवून फुलदाणीमध्ये ठेवता येईल. हवे असल्यास काडीला हिरवा रंग लावून कागदाची पाने ही चिकटवू शकता. (फोटो 9-10)

6) फोटोमध्ये 10 टिश्यू पेपर चे फूल दाखवले आहे. जितके जास्ती चौरस, तितके फूल गोलसर दिसेल. गोलसर फुलाला भिंतीवर सजावटीसाठीही वापरता येऊ शकते. (फोटो 11)

- संपदा कुलकर्णी

[email protected]