नादिया मुराद

दिंनाक: 17 Feb 2019 13:19:23


2018 नोबेल पुरस्कार विजेती नादिया मुराद. तुम्हांला प्रश्न पडला असेल की कोण नादिया? आणि मी या मुलीच्या जीवनावर लेख का बरे लिहिला?

नादिया मुराद ही पहिली नोबेल विजेती इराकी महिला ठरली आहे. या एकट्या मुलीने सिरिया, सौदी व इराक येथे महिलांवर अत्याचार करणार्‍या आयसीस (खडखड) या आतंकवादी संघटना विरुद्ध आवाज उठवला.

कारण नादिया स्वतः या अत्याचाराची शिकार झाली होती. नादिया हिचे पूर्ण नाव नादिया मुराद बसी तहा. नादियाचा जन्म 1993 रोजी इराकमधील सिंजर येथील कोजो नावाच्या गावात झाला. नादिया शिक्षणासाठी जर्मनीत राहायची व शिक्षण पूर्ण होताच ती कोजोमध्ये तिच्या परिवारासोबत राहायला आली. आयसीस (खडखड) संघटना येण्यापूर्वी याजिदी समाजचे लोक कोजोमध्ये राहत असत. पण एक दिवस अचानक आयसीसचा फरमान आला. त्या फरमानात लिहिले होते की, कोजो येथे राहणार्‍या याजिदी समाजाच्या लोकांनी इस्लाम धर्म स्वीकारावा पण याजिदी समाजाने याला नकार देताच आयसीसने त्यांच्यावर दबाव टाकण्यास सुरुवात केली. नादियाने यु.एन.मध्ये आलेल्या हर एक प्रतिनिधीला या घटनेबद्दल सांगण्याचा प्रयत्न केला. पण नादियाचे 2014 साली कोजो येथील तिच्या होमटाऊन येथून अपहरण झाले. नादिया सोबत 150 याजिदी परिवारांना सुद्धा बंधक बनवले. आयसीस आतंकवादी मुलींवर अत्याचार करत. तब्बल तीन महिने मुलींना बंधक करून अत्याचार करण्यात आला. पण जेव्हा केव्हा नादिया स्वतःची सुटका करण्याचा प्रयत्न करत, तेव्हा ते आतंकवादी तिला मारत तिला त्रास देत असत.

पण या सर्व अत्याचारांचा घाव काही मुली सहन करू शकत नव्हत्या. मग त्या आत्महत्या करत.

पण नादिया या सर्व अत्याचारांना बळी न पडता या नरकातून बाहेर पडली व तिची ही गोष्ट तिने UN या human trafficking वर आयोजित एका संमेलनाद्वारे सर्वांपर्यंत पोहोचवली आणि नादियाने तेथे आलेल्या सर्व देशांना विनंती केली की या आयसीस संघटनांचा नाश करा आणि विविध देशातील rescue team इराकला पोहोचली तेव्हा तिथे नादिया सारख्या 5000 मुली बंधक होत्या.

या धाडसी नादियाने मुलींना नरकातून बाहेर काढले, या नादिया मुरादवर गशपपर घशक्षरीज्ञळ या व्यक्तीने एक कादंबरी लिहिली आहे. या कादंबरीचे नाव – The last girl – The story of captivity fights with Islamic state. मीसुद्धा ही कादंबरी वाचली आहे. तुम्हीदेखील ही कादंबरी वाचा.

- स्मिता अतुल वखरे, इ.10वी

श्री खोलेश्वर माध्यमिक विद्यालय