मुंगी

दिंनाक: 16 Feb 2019 17:57:35

 

एकदा एक मुंगी

मोठ्यांदा हसली

गंमत म्हणून

स्वतःलाच डसली

मुंगीच्या नाकावर

आला मोठा फोड

चाटून पाहिला तिने

तर लागला की गोड!

अचानक अंग मग

पडलं तिचं जड

बरणीतल्या बरणीतही

चालता येईना मुंगीला

बघता बघता मुंगीचं

वाढलं की वजन

जागेवरच बसल्या बसल्या

करू लागली भजन

मग माय मुंगीबाई

आली मेटाकुटीस

अति गोड खाऊन त्यांना

झाला डायबेटीस...

 - कु. आकांक्षा थोटे

इ. ६ वी, कै. दा. शं. रेणावीकर विद्या मंदिर