प्राण्यांच्या शाळेत

उंटीणबाई आल्या

तरातरा खडू घेऊन

फळ्याकडे गेल्या॥

 

फळा होता सपाट

छान काळा काळा

अक्षर लिहिले वळणदार

मोत्यांच्या माळा॥

 

 पटपट लिहून घेणारी

हुशार पोरे होती

बाई बघती वह्या

आणि सह्या करून देती॥

 

इतक्यात झाली गंमत

हलू लागला फळा

पोरे मारती उड्या

आणि म्हणती चला पळा॥

 

बघा, बघा हत्ती

अक्षर पाठीवरती

मान उंच करून

उंटीणबाई हसती॥

 

 - चारूता प्रभुदेसाई

[email protected]