ऐका मुलांनो ऐका माणसाची गोष्ट

फार वर्षांपूर्वी एक चमत्कार झाला

शेपूट नसलेला माकड जन्माला आला

आपल्या दोन पायांवर चालायला लागला

मेंदू होता मोठा तो होता विचारी

शक्ती अन युक्तीने करी शिकारी

हळूहळू त्याने केली प्रगती

कंदमुळे सोडून करू लागला शेती

सुरक्षिततेची गरज वाढू लागली

म्हणून त्याने शेजारी शेजारी घरे बांधली

वस्तूंच्या गरजा वाढू लागल्या

समस्या सोडवण्याचा प्रश्‍न पडला

मग एक सभा त्याने बोलावली

सर्वांना कामे वाटून दिली

कुणी कपडे विणायचे

कुणी भांडी बनवायची

कुणी अवजारे बनवायची

कुणी दागिने बनवायचे

कुणी शेती करायची

परस्परांना सहकार्याचे महत्त्व कळाले

आता मात्र जगणे सोपे झाले

अशी वस्ती अन् व्यवसाय वाढले

आणि एक गाव तयार झाले.

 

 - मीनल कचरे, सहशिक्षिका

नवीन मराठी शाळा, पुणे

[email protected]