व्यवहारात राहूनही वनात योगसाधना करण्याऱ्या ऋषी मुनींप्रमाणे योगसाधना करणाऱ्या मनोज पटवर्धन यांनी लहान मुलांसाठी अगदी सोप्या भाषेत लिहिलेले ‘हसत खेळत पोपकॉर्न योग’ हे पुस्तक अत्यंत सुंदर आहे. साप्ताहिक विवेकने विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त पुस्तक प्रकाशित केले आहे त्याबद्दल विवेकचे अभिंनदन. असे मत, प्रसिद्ध बालसाहित्यकार ज्ञानदा नाईक यांनी ‘हसत खेळत पोपकॉर्न योग’ या पुस्तक प्रकाशनाच्यावेळी व्यक्त केले. दिनांक २५ डिसेंबर २०१९ रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर अध्यासन केंद्र, पुणे येथे पं. शौनक अभिषेकी आणि ज्ञानदा नाईक यांच्या हस्ते साप्ताहिक विवेक प्रकाशित व मनोज पटवर्धन लिखित ‘हसत खेळत पॉपकॉर्न कॉर्न‘ या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ संपन्न झाला. या वेळी बालसाहित्यकार राजीव तांबे, शिक्षणविवेकच्या कार्यकारी संपादक डॉ. अर्चना कुडतरकर, साप्ताहिक विवेकच्या प्रकाशन विभागाच्या प्रमुख शीतल खोत, डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या सविता केळकर, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे भालचंद्र पुरंदरे, महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे अनिल माणकीकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

- प्रतिनिधी