शिक्षणविवेकतर्फे आंतरशालेय नाट्यछटा स्पर्धा आणि नाट्यछटा लेखन स्पर्धा यांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांनी उदंड प्रतिसाद दिला. जवळपास ३० शाळांतून प्राथमिक फेऱ्या घेण्यात आल्या होत्या त्यात निवड झालेल्या स्पर्धकांची अंतिम फेरी आणि बक्षीस वितरण समारंभ दि. २५ डिसेंबर २०१९ रोजी पुण्यातील स्वा. सावरकर अध्यासन केंद्रात उत्साहात संपन्न झाला. 

नाट्यछटेसाठी ‘माझी माणस’ हा सर्वांच्याच जिव्हाळ्याचा विषय देण्यात आला होता. महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे रमा पुरुषोत्तम संकुल, शिक्षण प्रसारक मंडळी मुलींची शाळा, डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे मा. स. गोळवलकर गुरुजी प्राथमिक विद्यालय आणि न्यू इंग्लिश मिडीयम स्कूल पुणे या विद्यालयांत झालेल्या प्राथमिक फेरीमध्ये३० शाळांतून एकूण २६० स्पर्धकांचा सहभाग होता. सहभागी शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, पालक आणि शिक्षक प्रतिनिधी यांच्या सहकार्याने ही स्पर्धा यशस्वीपणे संपन्न झाली.
विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षक आणि पालकांनीही यात उत्साहाने सहभाग घेतला होता. स्पर्धकांच्या सादरीकरणामुळे आपली माणसं, नातेसंबध, जिव्हाळा या गोष्टींचे विविध पदर अनुभवायला मिळाले. आई-बाबा, ताई-दादा आजी-आजोबा यांच्याबरोबरच रिक्षावाले काका, पोस्टमन काका, डॉक्टर काका, कामवाल्या मावशी या सर्वांबद्दल मुलांच्या मानत वाटणारा आपलेपणा या सादरीकरणांतून व्यक्त झाला.विद्यार्थ्याचे पाठांतर, स्पष्ट शब्दोच्चार, सभाधीटपणाचे कौतुक परीक्षकांनीही केले.
या स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभासाठी उपस्थित असलेल्या बालसाहित्यकार ज्ञानदा नाईक, बालसाहित्यकार राजीव तांबे, डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या सविता केळकर, महाराष्ट्रा एज्युकेशन सोसायटीचे भालचंद्र पुरंदरे, महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे अनिल माणकीकर आणि योग शिक्षक मनोज पटवर्धन इत्यादी मान्यवरांच्या हस्ते अंतिम फेरीतील विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली. या वेळी सर्व गटातील प्रथम पारितोषिकप्राप्त विजेत्यांच्या नाट्यछटांच्या सादरीकारणाने उपस्थित प्रेक्षक आणि मान्यवरांची विशेष दाद मिळवली.

आंतरशालेय नाट्यछटा स्पर्धा २०१९ निकाल
पूर्व-प्राथमिक विभाग
प्रथम क्रमांक – नंदिनी यावलकर – न्या. रानडे बालक मंदिर
द्वितीय क्रमांक – नभा मुळगुंद - न्या. रानडे बालक मंदिर
तृतीय क्रमांक – मिहिका धोडपकर - न्या. रानडे बालक मंदिर
इयत्ता १ली व २री
प्रथम क्रमांक – आरोही भामे – एस.पी.एम.पब्लिक स्कूल
द्वितीय क्रमांक – मीरा निमगावकर - मा.स. गोलवलकर गुरुजी विद्यालय
तृतीय क्रमांक – वेदिका ओक - मा.स. गोलवलकर गुरुजी विद्यालय
इयत्ता ३री व ४थी
प्रथम क्रमांक – आर्यन देशपांडे – एस.पी.एम.मराठी माध्यम निगडी
द्वितीय क्रमांक – प्रियल वेदपाठक – नवीन मराठी शाळा
तृतीय क्रमांक – स्वरा मोरे - एस.पी.एम.मराठी माध्यम निगडी
इयत्ता ५वी ते ७वी
प्रथम क्रमांक – प्राची गवंडगावे - एस.पी.एम.मराठी माध्यम निगडी
द्वितीय क्रमांक – सृजन डांगे –des सेकंडरी स्कूल
तृतीय क्रमांक – रुद्र मोहिते – शिशुविहार एरंडवणा
इयत्ता ८वी व ९वी
प्रथम क्रमांक – श्रीपाद एडके – न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोड
द्वितीय क्रमांक – सानंता तुळजापूरकर –nems
तृतीय क्रमांक – ऋतुराज कुलकर्णी – न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग
पालक व शिक्षक
प्रथम क्रमांक – प्राजक्ता बेंद्रे (शिक्षिका) – न्या. रानडे बालक मंदिर
स्वरचित (शिक्षक)
प्रथम क्रमांक – हर्षाली अवसरे – न्या. रानडे बालक मंदिर
द्वितीय क्रमांक – वर्षा लोखंडे - शि.प्र.मं. मुलींची शिशुशाळा
तृतीय क्रमांक – नूतन देशमुख – शिशुविहार प्राथमिक कर्वेनगर
स्वरचित पालक
प्रथम क्रमांक – स्नेहल मेढेकर - एस.पी.एम. शिशुशाळा
द्वितीय क्रमांक – सौम्या कुलकर्णी– न्या. रानडे बालक मंदिर
तृतीय क्रमांक – (विभागून) हर्षदा धोडपकर आणि आशा कुलकर्णी – न्या. रानडे बालक मंदिर
शिक्षणविवेकतर्फे सर्व विजेत्यांचे अभिंनदन!!