शिक्षणविवेक आयोजित आंतरशालेय नाट्यछटा स्पर्धा २०१९

  • विषय :- माझी माणसं

विद्यार्थी बालमित्रांच्या कलांना वाव मिळावा आणि नाट्यछटा या मराठीतील साहित्य प्रकाराचे पुनरूज्जीवन व्हावे; यासाठी शिक्षणविवेकने ‘आंतरशालेय नाट्यछटा स्पर्धा’ आयोजित केली आहे.

  • स्पर्धेचे नियम

१. नाट्यछटा म्हणजे एकपात्री नाटक, कथाकथन किंवा नाट्य प्रवेश नव्हे. तो स्वतंत्र प्रकार आहे.

२. नाट्यछटेचा विषय वयोगटाला साजेसा व जवळचा असावा.

३. विद्यार्थ्याचे पाठांतर, स्पष्ट शब्दोच्चार, सभाधीटपणा, वाचिक व अंगिक अभिनय व प्रेक्षकांचा प्रतिसाद यांस गुण दिले जातील.

४. नाट्यछटेसाठी अनुरूप रंगभूषा व वेशभूषा केली तरी चालेल, पण त्यास स्वतंत्र गुण नाहीत.

५. नाट्यछटा किमान वेळेपेक्षा कमी व कमाल वेळेपेक्षा जास्त असल्यास बाद होईल.

. स्पर्धेत भाग घेतलेल्या स्पर्धकांनी आपल्या शाळेच्या शिक्षण प्रतिनिधींकडे नोंदणी करावी. शिक्षक प्रतिनिधींनी मुख्याध्यापकांच्या सहीचे पत्र, नाट्यछटेची प्रत आणि शुल्क कार्यालयात जमा करावे.

७. परीक्षकांचा निर्णय अंतिम असून तो स्पर्धकांवर बंधनकारक राहील.

८. प्रवेश शुल्क भरल्याशिवाय नोंदणी ग्राह्य धरली जाणार नाही.

९. एकदा भरलेले प्रवेश शुल्क परत मिळणार नाही.

१०. प्राथमिक फेरीचा निकाल स्पर्धा संपल्यानंतर लगेच जाहीर करण्यात येईल, त्याचवेळी अंतिमफेरी संदर्भात सूचना दिल्या जातील.

११. प्राथमिक फेरीतील विजेत्यांना अंतिम फेरीत आपली प्राथमिक फेरीतीलच नाट्यछटा सादर करावी लागेल.

 

  • शुल्क :

 

१. नाट्यछटा सादरीकरण - विद्यार्थी - रू. ३० प्रत्येकी.

२. नाट्यछटा सादरीकरण - शिक्षक/पालक – रु  ५० प्रत्येकी

३. नाट्यछटा लेखन - शिक्षक/पालक - रू. ५० प्रत्येकी.

 

  • स्पर्धेचे गट आणि सादरीकरणाचा वेळ 

 

१. पूर्वप्राथमिक विभाग          २ ते ४ मिनिटे

२. इ. १ ली व २ री              २ ते ४ मिनिटे

३. इ. ३ री व  ४ थी             २ ते ४ मिनिटे

४. इ. ५ वी ते ७ वी              ३ ते ५ मिनिटे

५. इ. ८ वी व ९ वी              ३ ते ५ मिनिटे

६. शिक्षक व पालक गट         ५ ते ७ मिनिटे

 

नावनोंदणी अंतिम तारीख : शनिवार, दि. २३ नोव्हेंबर, २०१९

प्राथमिक फेरी : २ डिसेंबर ते ७ डिसेंबर, २०१९ (स्पर्धेचे स्थळ शाळेत कळवण्यात येईल.)

अंतिम फेरी : बुधवार, २५ डिसेंबर, २०१९

अंतिम फेरी स्थळ : स्वा. सावरकर स्मारक व अध्यासन केंद्र, विमलाबाई गरवारे शाळेसमोर, कर्वे रोड, पुणे.

संपर्क : शिक्षणविवेक, म.ए.सो. भवन, १२१४-१२१५ सदाशिव पेठ, पुणे ३०. संपर्क – ७३०४४०१५२२

मेल आयडी – [email protected]

 

नाट्यछटा म्हणजे काय, हे पाहण्यासाठी खालील लिंकला भेट द्या. https://www.youtube.com/watch?v=fzEjZ7jncFM&feature=youtu.be 

स्पर्धेचे नियम वाचण्यासाठी www.shikshanvivek.com ला भेट द्या.