दिनांक २० नोव्हेंबर २०१९ रोजी, महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या महिलाश्रम हायस्कूल येथे शिक्षणविवेकतर्फे शुद्धलेखन आणि जाहिरात लेखन या कार्यशाळा झाल्या. शाळेच्या मुख्याध्यापक उमा ताई जोशी आणि स्नेहल मेहंदळे आणि सुषमा जाधव या कार्यक्रमाच्या वेळी उपस्थित होत्या.पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी शुद्धलेखन कार्यशाळा घेण्यात आली. आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी जाहिरात लेखन ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली. या वेळी प्रेमला बराटे व गौरी गोळे या शिक्षिका उपस्थित होत्या.शुद्धलेखन आणि जाहिरात लेखन कार्यशाळेला मुलींचा चांगला प्रतिसाद मिळाला. अशा कार्यशाळा नेहेमी व्हाव्या अशी इच्छा मुख्याध्यापक उमा ताई जोशी यांनी व्यक्त केली. शिक्षणविवेक उपक्रम सहाय्यक
स्वाती यादव यांनी शुद्धलेखन व जाहिरात लेखन या कार्यशाळा घेतल्या.