महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या महिलाश्रम शाळेच्या विद्यार्थिनींची शिक्षणविवेकच्या कार्यालयाला भेट.
गुरुवार, दि. २१ नोव्हेंबर २०१९ रोजी महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या महिलाश्रम शाळेच्या विद्यार्थिनींनी शिक्षणविवेकच्या कार्यालयाला भेट दिली. आपल्या हातात पडणारा शिक्षणविवेकचा अंक तयार होण्यामागे विषय ठरवणे मजकूर मागवणे, टायपिंग, मुद्रितशोधन करणे, चित्रे काढून घेणे, अंकाचे आरेखन ते छपाई व वितरण असा प्रवास असतो. त्यामागे प्रत्येकाची केवढी मेहनत असते हे मुलींनी समजून घेतलं. ऐनवेळी उद्भवणाऱ्या अडचणी, त्यावर शोधावी लागणारी उत्तरे या याबद्दलची माहिती मुलींनी करून घेतली. या प्रसंगी विद्यार्थिनींनी, शिक्षणविवेकच्या सर्व टीमची ओळखही करुन घेतली.

- प्रतिनिधी