दिनांक १९ नोव्हेंबर २०१९ रोजी, डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या हिंदुस्थान ऍन्टीबायोटिक्स स्कूल, पिंपरी येथे शिक्षणविवेकतर्फे पपेट शो, शुद्धलेखन आणि  जाहिरात लेखन या कार्यशाळा झाल्या.  प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापक कल्पना आगावणे आणि माध्यमिक शाळेच्या पर्यवेक्षक स्मिता करंदीकर या कार्यक्रमाच्या वेळी उपस्थित होत्या.

इयत्ता पहिली ते चौथीच्या मुलांसाठी पपेट शोमध्ये 'रेस २' तर पाचवीच्या मुलांसाठी 'वाढदिवस' ही गोष्ट सादर करण्यात आली. त्यानंतर पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी शुद्धलेखन कार्यशाळा घेण्यात आली.  आठवी  ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी जाहिरात लेखन ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.

पपेट शोला मुलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. हशा आणि टाळ्यांच्या कडकडाटाने मुलांनी पपेटला दाद दिली. तसेच शुद्धलेखन आणि जाहिरात लेखन कार्यशाळेला सुद्धा मुलांचा चांगला प्रतिसाद मिळाला. अशा कार्यशाळा नेहेमी व्हाव्या अशी इच्छा  कल्पना आगावणे आणि स्मिता करंदीकर यांनी व्यक्त केली.

शुभदा कुलकर्णी, सायली शिगवण आणि स्वप्ना कुलकर्णी यांनी पपेट शोचे सादरीकरण केले तर स्वाती यादव यांनी शुद्धलेखन व जाहिरात लेखन या कार्यशाळा घेतल्या.