पत्र - महिमा

आपल्या मित्राचं पत्र आलं, किंवा एखाद्या नातेवाइकाचं पत्र आलं की किती आनंद होतो आपल्याला! ते पत्र घेऊन नाचावंसं वाटतं अगदी! आपल्याला एखादं बक्षीस मिळालं तर आनंद वाटतोच; पण त्याबद्दल अभिनंदन पत्र आपल्याला कोणी पाठवलं तर.. अगदी दुधात साखरच ! असा पत्र-महिमा!

हे सार आठवण्याचं कारण, नऊ ऑक्टोबर हा जागतिक टपाल-दिन आहे. हे आहे! म्हणजे पत्राचा आनंद जगातील साऱ्याच माणसांना होतो. 'तो करावा, असा सदेश देणारा हा 'जागतिक करतात. टपाल दिन' होय!

पत्रांचा व टपालखात्याचा आपल्याशी कितीतरी जवळचा संबंध येतो. आपण नेहमी पोस्ट ऑफीस पाहातो. तेथे जाऊन पत्रे विकत घेतो. आपण लिहिलेली पत्रे टपालपेटीत टाकतो. आपल्याला पोस्टमनकाका भेटतात. आपल्याला ते पत्रे, पाकिटे, मासिके आणून देतात. आपल्यापैकी अनेकांना तिकिटे जमविण्याचा छंद असतो. केव्हातरी आपल्याकडे मनीऑर्डरने पैसेही आलेले असतात. ही सारी कामे टपालखाते करते. दूरदूरच्या गावापर्यंत आपल्या पत्रांची ने- आण करणारं जाळं सर्व भारतभर टपालखात्याने विणलेलं आहे.

इतिहासाचा मागोवा!

अशा या टपालखात्याची माहिती शोधली तर खपच आनंद वाटेल. आपल्या देशातील टपाल पद्धती 'ईस्ट इंडिया कंपनीने' सुरू केली. पहिले टपाल तिकीट इ.स. १८५२ मध्ये कराची येथे काढण्यात आले. इ.स. १८५४ मध्ये 'टपाल व तार खाते' स्थापन करण्यात आले. भारत स्वतंत्र झाला, तेव्हा देशभर २२,११६ टपाल कचेऱ्या होत्या. इ.स.१९८० अखेर टपाल कचेऱ्यांची संख्या १,३६,९९९ होती. त्यापैकी १,२२,८३९ होती. टपालकचेऱ्या ग्रामीण भागात १४,१६० टपाल कचेऱ्या शहरी भागात करण्यासाठी तार विभाग व दूरध्वनी विभागही विकसित करण्यात आले. करणारं (त्यापैकी तारविभाग अलीकडेच बंद तर करण्यात आला.) (मराठी विश्वकोश - खंड - १२ पृ. २४६-२४७ वरून) १९७३ मध्ये दिल्ली येथे तिकीट संग्रहाचे पोस्टाच्या पाकिटांवर तिकिटे लावतात. ही तिकिटे म्हणजे आपला चालता-बोलता इतिहास व संस्कती यांचा ठेवा असतो. अनेक विद्यार्थी आपल्या साजरा देशीतील व परदेशांतील तिकिटांचा संग्रह हा खपच चांगला छंद आहे. अशा तिकिटांचे वर्गीकरण करून त्याला एक व्यवस्थित असे स्वरूप देता येते. पोस्टाच्या अशा तिकिटांची माहितीही रंजक आहे. ६ मे १८४० रोजी ग्रेटब्रिटनमध्ये पहिली तिकीट विक्री सुरू झाली. तेव्हापासूनच तिकीट संग्रहालाही चालना मिळाली. भारतात ईस्ट इंडिया कंपनीने इ.स १६८८ मध्ये मुंबई व मद्रास येथे टपाल कार्यालये सुरू केली. इ.स १७६३ मध्ये रॉबर्ट क्लाइव्हने व्यवस्थित टपालसेवा सुरू केली. इ.स. १८३७ च्या कायद्यानुसार सर्व भारतभर टपालसेवा सुरू झाली. सुरुवातीची तिकिटे अर्धा आणा किंमतीची होती. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यांनतर होत्या. तर भारतीय संस्कृतीचे व कलेचे वैविध्यपूर्ण दर्शन घडवणाऱ्या तिकिटांच्या मालिका  प्रमुख प्रतीक आहे. भारतीय पक्षी, प्राणी, अभिजात नृत्ये, महान व्यक्ती इत्यादींच्या मालिका सुरू आहेत. तिकिटांचा संग्रह करणे, या छंदास खूपच महत्त्व आहे. आंतरराष्ट्रीय प्रदर्शन भरवण्यात आले होते. त्यात ११२ देशांनी भाग घेतला होता. ('मराठी विश्वकोश' - खड १०-पृ.- १३९ ते १४० मधून) पत्रलेखनाचा इतिहास खूप प्राचीन आहे. आपल्या महाभारत, रामायण, पुराणकथा यांमध्ये पत्रलेखनाचे संदर्भ मिळतात. छत्रपती शिवाजी महाराजांपासून पेशव्यांपर्यंतच्या व्यक्तींनी केलेले पत्रव्यवहार ऐतिहासिक ठेवा महत्त्वाचे मानले जातात. त्यांचे जतनही जसे केले जाते, तसे त्याचे अध्ययनही केले जाते.

पत्रलेखन एक कला! एक संवादाचे तंत्र!

आपल्या दैनंदिन जीवनातही पत्रांना खूप महत्त्व आहे. अलीकडे मोबाईल, इ-मेल, एस.एम.एस. इत्यादींमुळे पत्रलेखनाचे प्रमाण कमी झालेले दिसते. तरी पत्रसंवादाचे महत्त्व मात्र कमी झालेले नाही आणि होता कामा नये! विद्यार्थी मित्रांनो! पत्रलेखन ही एक कला आहे. त्याचप्रमाणे पत्रलेखन ही एक चांगली सवय आहे. अनेकदा वाटते की, घरातल्या घरात किंवा अगदी जवळच्या व्यक्तींना कशाला पत्र लिहायचे? पण हे बरोबर नाही. आपल्याला आपल्या अभ्यासक्रमात 'पत्रलेखन' हा एक महत्त्वाचा घटक आहे. आपण मित्रास पत्र, आईस पत्र अशी पत्रे लिहितो. केव्हा तरी सहलीची चौकशी करणारे पत्र, आपण पर्यटन-अधिकारी यांना लिहितो. अशी औपचारिक आणि अनौपचारिक पत्रे आपण लिहितो..अशा पत्रलेखनाचे तंत्र आपण समजून घेतले पाहिजे. पत्राच्या उजव्या बाजूस आपला पत्ता लिहितो. पाकिटावर पत्ता लिहिताना पिनकोड नंबर लिहितो. अशा तांत्रिक बाबी आपण समजून घेतल्या पाहिजेत.

पत्रः सांस्कृतिक ठेवा!

आपल्या पत्रलेखनातील सांस्कृतिक ठेवाही तेवढाच महत्त्वाचा आहे. आपल्या मित्रांना किंवा आईबाबांना पत्र लिहिताना पत्राच्या वरील बाजूस 'श्री' असे ठळक लिहिण्याची पद्धत आहे. आपल्या

आराध्य दैवताचे नाव लिहिण्याचीही पद्धत आहे. शुभत्वाचे, मांगल्याचे, श्रद्धेचे ते प्रतीक आहे. वि. स. खांडेकर यांनी ‘मंझधार' हे एक ललित निबंधाचे पुस्तक लिहिले आहे. त्यात एका निबंधाचे नावच आहे 'श्री'. तो निबंध मिळवून वाचा. आपल्या आईबाबांना पत्र लिहिताना त्याच्याबद्दलचा आदरभाव व्यक्त करण्यासाठी 'तीर्थरूप'/'तीर्थस्वरूप'। असे लिहिण्याची पद्धती आहे. ही। आदरभावना मनात असायला हवी. 'नमस्कार करणे', 'अभिवादन करणे' या काही भावशून्य, तांत्रिक बाबी नाहीत. त्यामागे पत्रलेखकाच्या मनातील नम्रता, शालीनता, कृतज्ञता दिसून येते. म्हणून त्या शब्दांचे अर्थ समजून त्यांचे लेखन केले पाहिजे. पत्राच्या अखेरीस आपला नम्र. आपला आज्ञाधारक, आपला विश्वासू असे लिहिण्याची पद्धत आहे. पत्राच्या अखेरीस असलेल्या या शब्दांचे अर्थ समजून घ्या. म्हणजे लक्षात येईल की आपली पत्रलेखनाची परंपरा मुलांच्या मनावर संस्कार करणारी आहे. आपल्या मनावरील हे संस्कार आपल्या पत्रातून व्यक्त झाले पाहिजेत!

भाषा पत्राची!

आपले पत्र म्हणजे आपल्या मनाचा आरसाच जणू! आपण आपल्या पत्रातून बोलतो का? - मनापासून बोलतो का? ज्यांना पत्र लिहायचे त्यांच्याबद्दलचा आदरभाव शब्दाशब्दांतून प्रकट व्हायला हवा. मित्रास पत्र असेल तर मित्रत्व, खेळकरपणा, जिव्हाळा व्यक्त व्हायला हवा. आपले पत्र म्हणजे जणू काही आपल्या विचारांचा दूत' आहे. याचे भान ठेवून लिह या! पत्राची भाषा बोलकी, प्रभावी व आटोपशीर असावी... विद्यार्थ्याचे पत्र म्हणजे केवळ प्रश्नाच्या उत्तराचा सराव नव्हे; तर आपल्या सवयीचा एक भाग असावा. प्रसंग विशेषी खरोखरच पत्रे लिहावीत. आपल्या मित्राचा, आईचा, भावाचा वाढदिवस असे प्रसंग म्हणजे अशा पत्रलेखनाची सुंदर संधीच असते. अनेकदा नेहमीच्या बोलण्यातून आपल्या भावना आपल्याला व्यक्त करता येत नाहीत. अशा वेळी पत्राचा आधार घेता येतो. आपल्या आई विषयी कृतज्ञता व्यक्त करता येत नाहीत. अशा वेळी पत्राचा आधार घेता येतो. आपल्या आईविषयी कृतज्ञता व्यक्त करणारे पत्र लिहा बरं! आई आपल्यासाठी किती कामे करते, आपली काळजी घेते, घरी आपली वाट पाहाते. आई नोकरी करीत असली तरी आपल्या मुलांबद्दल तिला सतत काळजी वाटते. केव्हातरी तुम्ही आजारी असताना आईने जागरण केलेले असते...! अशा साऱ्या गोष्टींबद्दल आपण कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. त्यासाठी सुंदर पत्र लिहिलं पाहिजे. आपल्या पत्रातून आपल्या भावना व्यक्त होतात, तेव्हा ते पत्र म्हणजे एक सुंदर कविताच होते! अशा पत्रलेखनाबद्दल एक आणखी लक्षात ठेवा. त्या पत्राची एक प्रत आपल्यासाठी लिहून ठेवा. अशा आपण लिहिलेल्या पत्रांचा संग्रह तुम्हाला खूप आंनद देईल.

'चला, तर मित्रांनो!

पत्रलेखक बनू या!

पत्राची सवय लावून

मन मोकळे करू या!'

पत्राच्या माध्यमातून मनामनांमध्ये पूल बाधू या!

‘पत्र नव्हे मित्र' असे म्हणून

पत्रांशी मैत्री करू या! आणि...

पत्रांतून मित्र जोडू या!

पत्र आपल्या मनाचा आरसा- !

हा स्वच्छ आरसा आपल्यासाठी आणि सर्वांसाठी!

प्रश्नाचे उत्तर म्हणून पत्र लिहच. पण, पत्र लिहून आपल्या मनातील कृतज्ञताही व्यक्त करू या!!

- श्रीराम वा. कुलकर्णी