विदयार्थी मित्रांनो आज मी तुम्हाला आमच्या घरातील अत्यंत सुंदर अशा सदस्यांची ओळख करून देणार आहे.त्या सदस्याचे नाव आहे कविता आम्ही लाडाने त्यांना काव्य असे म्हणतो.त्यांच्या जन्मदात्यांना कवी आणि कवियत्री असे संबोधतो.

कवितेचा जन्म कसा झाला अशी तुम्हाला उस्तुकता असेल नाही का ?

मग ऐकूयात कवितेची कहाणी

अगदी आदिमानवापासून काव्याची निर्मिती झाली आहे कारण त्यावेळी कोणतीही भाषा नव्हती पण एकमेकांना साद घालताना एका विशिष्ट आवाजात तालात साद घालत होते .तेव्हापासूनच कवितेची सुरुवात झाली असावी. काव्याचे खंडकाव्य, पंडीतीकाव्य, दीर्घकविता असे काही प्रकार आहेत

 खंडकाव्य हा निबंध काव्याचा एक प्रकार मानला जातो सलग निबंध म्हणता येईल अशी दीर्घकविता, विशेषतः कथात्मक  कविता  म्हणजे  खंडकाव्य  आज समजले जाऊ लागले  आहे. खंड्काव्याचे विषय बहुदा पौराणिक, ऐतिहासिक, सामाजिक,अथवा कल्पनारम्य असत. रामायण, महाभारत यासारख्या खंड्काव्याची निर्मिती झाली. कालिदास यांचे मेघदूत, म.मो.कुंटे यांचे राजाशिवाजी , वि.दा.सावरकर यांचे कमला हि खंडकाव्याची काही उदाहरणे आहेत.

यानंतर प्रारंभ झाला तो पंडितीकाव्याला.  पंडितांची काव्यरचना विषयानिष्ठ आहे. यामध्ये कवीमुक्तेश्वर, वामनपंडित,रघुनाथपंडित श्रीधर,मोरोपंत,इ.कवींनी लिहलेले आख्यानपर काव्य म्हणजे पंडितीकाव्य. यथार्थदीपिका,नलदमयंतीस्वयंवर, हरिविजय , रुक्मिणीस्वयंवर, शिवलीलामृत, हि पंडितीकाव्याची काही उदाहरणे आहेत.

बरं का मंडळी तुम्ही संतांचेअभंग वाचले असतीलच  तर संत ज्ञानेश्वर, संतएकनाथ, संततुकाराम, संत रामदास, यांनी त्यांच्या ओव्यातून व अभंगातून लिहले ते संतकाव्य.

कालिदास यांचे मेघदूत, म.मो.कुंटे यांचे राजाशिवाजी , वि.दा.सावरकर यांचे कमला हि खंडकाव्याची काही उदाहरणे आहेत. अशाप्रकारे हळूहळू कवितेचे स्वरूप पालटू लागले.कविता हि हिऱ्याप्रमाणे आहे मराठी साहित्यातील काव्याला कितीतरी कवींनी पैलू पाडून तेजस्वी बनवले आहे.त्यात पहिल्यांदा कवी केशवसुत यांनी तुतारी फुंकली यानंतर बालकवी,कुसुमाग्रज,बहिणाबाईचौधरी, माधवजुलियन, ग.दि.माडगुळकर, विंदाकरंदीकर ,शांताशेळ्के ,इ.कविपासून ते अरुणाढेरे प्रवीण दवणे,संगीता बर्वे यासर्वांनी नवकाव्याची ज्योत तेवून प्रकाशमय काव्यनिर्माण करण्याचे कार्य अजूनही सुरु ठेवले आहे. या सर्व कवींना आपण आदरयुक्त प्रणाम करूयात व त्यांच्या कवितांचे स्मरण करूयात. अशा प्रकारचे भरपूर कवितासंग्रह आमच्या घरात तुम्हाला वाचायला मिळतील.

विद्यार्थी मित्र,मैत्रिणींनो, तुम्हाला कवितेची माहिती समजली का ? आवडली असेल तर नक्की सांगा व आपल्याला आवडलेली एक कविता नक्की शेअर करा.

धन्यवाद

  • गायत्री जवळगीकर