विश्वास दे...

दिंनाक: 05 Oct 2019 14:35:50


अंधारल्या दाही दिशा

तेजाळणारा सूर्य दे

ही वाट एकाकी तरी

तू चालण्या सामर्थ्य दे

 

तू दे कितीही दु:ख दे

सोसावयाला धैर्य  दे

प्राबल्य दे मांगल्य दे

चैतन्य दे कारूण्य दे

 

दे लीनता तू भक्ती दे

देण्यातला आनंद दे

दे आर्तता तू शक्ती दे

देण्याचसाठी सर्व दे

 

कोमेजलेली ही मने

तू चेतनामय आस दे

ज्यांनी उमेदी हारल्या

त्यांना तुझा विश्वास दे

 

आधार दे तू धीर दे

दे साधना अभ्यास दे

येवो झळाळी बुद्धिला

ती धार तू शब्दास  दे

 

- स्वाती यादव