विवेक दीप उजळूया...

दिंनाक: 26 Oct 2019 13:34:16


अगदी मनापासून शुभेच्छा ! अनंत अनंत शुभेच्छा ! सुट्टीत काय काय करायचं? कुठे सहलीला जायचं? असे सुंदर सुंदर प्रश्न तुमच्या मनात फेर धरून नाचत असतील! तुम्ही दिवाळीसाठी छान आकाशकंदील करा.

नेहमी तुम्ही आकाशकंदील विकत आणत असाल तर या वर्षी ठरवा, आणि तयार केलेला आकाशकंदील लावा! चला, आकाशकंदिलाच्या तयारीला लागा. रंगीत, सुंदर आकाराचा, अगदी वेगळा असा आकाशकंदील तयार करा आणि नावा आपल्या खिडकीत. रंगीत कागद, कात्री, डिंक असा पसारा घालून बसलात तर मला तरी मजा वाटेल!

आणि हो! दिवाळीनिमित्त 'शुभेच्छापत्र' आपण पाठवतो. अशी पत्रं विकत कशाला आणायची? चला, तुम्हीच 'शुभेच्छापत्र' तयार करा. बाबांना, आईला, दादा, ताई, आजी, आजोबा अशा घरातल्या सर्व माणसासाठी शुभेच्छापत्र' तयार करा. आणखी कोणाला पाठवायची स्व शुभेच्छापत्र ? यादी करा. सुंदर सुंदर कल्पना, अ शब्द, तुम्ही स्वत:च तयार केलेल्या सुंदर एन कविता, चित्रे यांचा उपयोग करा. आपले मित्र, मो आवडते शिक्षक, मुख्याध्यापक यांच्यासाठीही हो छान छान शुभेच्छापत्र तयार करा आणि त्यांना रांग द्याच! मुख्य म्हणजे 'शिक्षण विवेक'लासुद्धा एक गो 'शुभेच्छापत्र' पाठवा! वाट पाहतो तुमच्या अशा कि सुंदर शुभेच्छांची.

दिवाळीत किल्ले तर करायला हवेतच! आपल्या कल्पनेतला सुंदर, भव्य असा किल्ला करा, न खऱ्याखुऱ्या किल्यांची माहिती जमवा. छत्रपती शिवाजी महाराज, त्यांचे मावळे, सरदार, त्यांचे पराक्रम यांचा अभ्यास करा, आधुनिक कल्पना, न जुना किल्ला यांचा मेळ घाला. किल्ल्यांची प्रदर्शन पाहा. आपल्या मनातल्या कल्पना त्या किल्ल्यात साकार करा. भुयार, कोठी, पागा, बालेकिल्ला, दरबार, राजवाडा.... आणि खूप काही. आपला किल्ला आपण मित्रांनी मिळून करण्यात खूप मजा असते! किल्ला पाहायला येणाऱ्यांना माहिती द्या. त्याचीही तयारी करा. चला, किल्लेदार व्हा तर. किल्ला कुणी करावा? कुणीही! पहिलीतला मुलगा असेल वा बारावीतला! किल्ल्यावर हक्क सर्वांचा.

दिवाळी हा तर रांगोळ्यांचा सण! नव्या सुंदर रांगोळ्या काढायला शिका. ठिपक्यांच्या आधाराने काही रांगोळ्या आहेत. तर काही स्वतंत्र, दररोज नव्या नव्या रांगोळ्या कादा. आपल्या घरासमोर रांगोळ्या काढा. शेजारी एखादे मंदिर असेल, तर तेथेही रांगोळ्या काढा. मोहक आकृत्या, सुंदर रंग यात अगदी दंग होऊन जा! रांगोळ्या कुणी काढाव्या? कुणीही रांगोळ्यातून सुंदर प्रतीके काढा. पणती, कमळ, गोपक्ष, लक्ष्मीची पावले, स्वस्तिक अशी किती तरी! असे एकेक प्रतीक म्हणजे सुंदर चित्रलिपीच असते.

दिवाळी म्हणजे वैभव तेजाचा सण! दिवाळीच्या प्रत्येक दिवसाचे महत्त्व अगदी वेगळे असते. वसुबारस, धनत्रयोदशी, धन्वंतरी जयंती, नरकचतुर्दशी, लक्ष्मीपूजन, बलिप्रतिपदा, दिवाळी पाडवा, भाऊबीज असा सणांचा उत्सव असतो। त्या त्या सणांची माहिती मिळवा. आपल्या सोसायटीत किंवा अपार्टमेंटमध्ये एखादा सुंदर फळा असले, त्या फळ्यावर त्या त्या दिवसाचे महत्त्व लिहून ठेवा. मित्रांनी एकत्र येऊन एकेक दिवस वाटून घ्या! बघा, दिवाळी कशी डोळसपणे साजरी करता येते! चौकसपणे माहिती मिळवा. आजीशी, आजोबांशी गप्पा मारा. त्यांच्या आठवणीतली दिवाळी समजून घ्या! दिवाळी हा नात्यांचा सण आहे! भाऊ-बहीण, आई-बाबा, आजी-आजोबा, मित्र अशा नात्यांचे रेशीमधागे गुंफून तो साजरा करा, तो सण सांगतो, "आपण सारे एक आहोत आपण सारे मिळून आनंदी राहू या." आणि आनंद साजरा करताना इतरांना त्रास होणार नाही याची काळजी घेऊ या. आवाजाचे फटाके वाजवू नका. त्यामुळे ध्वनिप्रदूषण होते. धुराचे दारूकाम टाळू या. आजूबाजूला राहणान्यांना त्याचा त्रास होतो. हवेचे प्रदूषण होते. म्हणून त्यांचा वापर नकोच. तरुणांनाही तसे सांगा. विनाफटाक्यांची दिवाळी ही आदर्श दिवाळी!

 मित्रांनो, दिवाळी हा सण आहे दिव्यांचा, प्रकाशाचा प्रकाशाची पूजा, तेजाची उपासना करण्याचा हा सण सूर्यफूल आणि सूर्य याचे नाते कसे असते? सूर्याच्या दिशेने सूर्यफूल अनुसरण करीत असते. आपलेही तसेच आहे. तेज म्हणजे पराक्रम, आरोग्य, मान! त्यांची साधना करण्याचा संदेश हा सण देतो. आरोग्याची साधना करणे म्हणजे तेजाची उपासनाच असते. ज्ञान हे प्रकाशासारखेच अज्ञानाचा अंधार दूर करून ज्ञानाचा प्रकाश सर्वत्र पसरला पाहिजे ज्ञानाची साधना करण्याचा आनंद सर्वश्रेष्ठ आनंदा पुस्तके वाचण्यासाठी वेळ ठेवायलाच हवा। मित्रांनो, सुट्टी हे आपल्याला मिळालेले सुंदर वरदान आहे. सुट्टीत खेळा, मजा करा. ते करायला हवेच. पण वाचनासाठी वेळ ठेवा. दररोज तास-दोन तास वाचनासाठी ठेवा. उत्तम साहित्य वाचा. चरित्रे, आत्मचरित्रे, इतिहास, प्रवासवर्णने, चरित्रात्मक कादंबऱ्या, ललित निबंध, कविता असे साहित्यप्रकार मनाला आनंद देणारे आहेत. हे फक्त सुचविले. पण, निवड तुम्ही करा. वाचनासाठी जवळच्या ग्रंथालयाचे सदस्य व्हा. दिवाळीनिमित्त पुस्तके खरेदी करा. त्यासाठी आई-बाबांची मदत घ्या. वाचनाला लेखनाची जोड बा. रोज काही वेळ लेखनासाठी द्या. काय लिहावे? आई-बाबा, आजी आजोबांकडून निबंधासाठी विषय घ्या. स्वतः विषय शोधा. त्यावर सुंदर अक्षरात, मुद्देसूद निबंध लिहा. चरित्र लिहा.

आपल्या संतांनी ज्ञानाला तेजाची उपमा दिली आहे. ज्ञानासाठी चिंतन हवे. मन स्थिर हवे. मनाला शांतपणा हवा. अनेक प्रश्न आपल्याला सुचायला हवेत. त्यांची उत्तरे शोधायचा आपणच प्रयत्न करायला हवा. चांगले काय वाईट काय; योग्य काय, अयोग्य काय याचा विचार करण्याची शक्ती म्हणजे 'विवेक.' अज्ञानाचा विनाश करून त्याला ज्ञानमय करून सोडणे हा ज्ञानाचा स्वभाव होय. विवेकाच्या मार्गाने जाताना अविवेकाची काजळी दूर करावी लागते. विवेकाचा हा मार्ग ज्ञानी लोकांना, योगी लोकांना आनंदाचा वाटत आहे. आपणही असा विवेकचा मार्ग धरू या. त्यातून आनंद मिळवू या. दिवाळीचा हा अर्थ शाब्दिक नाही, तर अनुभवाचा आहे. संत ज्ञानेश्वरांनी त्याबद्दल जे म्हटले आहे. ते आपल्याला नवा प्रकाश देईल. त्या प्रकाशात आपण वाटचाल करू या, त्याबद्दल अंतर्गत होऊन विचार करू या. संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात,

'मी अविवेकाची काजळी।

फेडूनि विवेकदीप उजळीं।

तैं योगियां पाहे दिवाळी।

निरंतर।।"

ज्ञानेश्वरी अ. ४-५४.

- श्रीराम वा. कुलकर्णी