बबलू  पिल्लू...

दिंनाक: 12 Oct 2019 17:46:19


बबलू हत्तीचे एकदा डोके दुखू लागले

आईबाबा त्याच्यासवे रात्रभर जागले

 

आई त्याची हुशार फार शहरातून अँनासिन आणल्या चार

घे म्हणाली घशात सार वरून पाण्याची धर धार

 

गोळ्या घेऊनसुद्धा डोकं काही राहीना

काही केल्या बबलू ऊस गवत खाईना

 

काळजीत पडले चित्त झाले असेल त्याला पित्त

सदा उन्हात हिंडत बसतो वेळेवर खात नसतो

 

वैतागून आई परत शहरात गेली लांब

फार भरभर चालून आणला झंडू बाम

 

सोंड बाटलीत जाईना बाम लावता येईना

काय उपाय करावा काही काही सुचेना

 

बबलूची मग आजी आली

तोडून आणली लांब वेली

डोकं बांधले करकचून

सोंडेने मऊ दिले चेपून

 

डोके दुखायचे थांबले देवच पावला

ऊस खायला बबलू लुटूलुटू धावला

 

स्वाती यादव.

०९.११.२०१६.