साहित्य : 
१) कागद (रंगीत/ वापरलेला)  २) फेविकॉल
३) पेन/पेनाची रिफील/बांबूची काडी (गोलाकार लांबट वस्तू)
४) अक्रेलिक रंग (वापरलेले कागद घेतल्यास)
५) २ वापरलेल्या C.D / पुठ्याचे २ गोलाकार तुकडे 
 
कृती :
१) कागदाच्या सुरळ्या करा.(सुरळ्या कशा करायच्या हे पाहण्यासाठी खाली दिलेल्या पेपर बाऊल या लिंकवर क्लिक करा.) 
२) दोन्ही C.D च्या एका बाजूस रंगीत/ साधा कागद चिकटवा. C.D ऐवजी पुठ्याचे २ गोलाकार तुकडे ही वापरू शकता. (पुठ्ठा वापरल्यास आकार कमी-जास्त करता येईल). कागदाची बाजू खाली ठेऊन, C.D वर समान प्रमाणात कागदाच्या सुरळ्या चिकटवा. फक्त एका ठिकाणी २ सुरळ्या चिकटवा व वरून दुसरी C.D चिकटवा. 
३)A  सुरळी वळवून, B व C सुरळीच्या पलीकडे न्या. मग C सुरळी A   सुरलीच्या वरून D च्या पलीकडे न्या. D सुरळी C च्या वरून E च्या पलीकडे न्या. अश्या तर्‍हेने गोल संपला की N सुरळी B सुरळी पलीकडे न्या. मग दुसर्‍या थरासाठी, B सुरळी दुमडलेल्या C सुरळीच्या वरती न्या. A  सुरळी D च्या पलीकडे न्या आणि C ला E च्या पलीकडे न्या. अश्या तर्‍हेने पेपर बास्केट विणत जा. सुरळी कमी पडल्यास, त्यास दुसरी सुरळी जोडा.
४) हवी तेवढी बास्केट तयार झाली की प्रत्येक सुरळीला कापून, पुढील बाजूस चिकटवा. सुरळी नीट चिकटण्यासाठी पेपर क्लीपचा वापर करा. C.D च्या आकाराचे बास्केट बनवण्यासाठी साधारणता २५-३० सुरळ्या लागतात. 
५) बास्केट तयार झाल्यावर, फेविकॉल व पाण्याचे मिश्रण करून बास्केटच्या सर्व बाजूने लावा ज्यामुळे ते कडक होईल. तयार झालेल्या बास्केटला हवा तो रंग लावा. रंगीत कागद असल्यास, फेविकॉल लावल्यानंतर चिकटपणा जाण्यासाठी पारदर्शी स्प्रे पेंट मारा. विविध आकाराच्या बास्केट पासून विविध वस्तू जसे पेन स्टँड, फुलदाणी, ट्रे इत्यादी ही बनवता येतात . 
 
- संपदा कुलकर्णी