साहित्य :

आईस-क्रीमच्या काड्या, फेविकॉल, जाड पुठ्ठा (साधारण ७-९ ला आकाराचा), टिश्यू पेपर रोलच्या आतील गोलाकार पुठ्ठा, रंग (शक्यतो अ‍ॅक्रेलिक; ते नसल्यास वॉटर कलर/ क्रेयॉन ही चालतील)

कृती :

१) एक चौरस पुठ्ठा घ्या (पेन स्टँड ज्या मापाचा हवा आहे त्यानुसार पुठ्ठयाचे माप घेणे). त्यावर २ बाजूस आईस-क्रीमच्या काड्या फेविकॉलने चिकटवा. त्या काड्यांवरून उरलेल्या २ बाजूंवरही २ काड्या चिकटवा. अशा रीतीने दोन्ही बाजूस आलटून-पालटून काड्या चिकटवा. (फोटो १-५)

२) हवा तेवढा आकार झाल्यावर त्यावर रंग लावून आकर्षक बनवा (फोटो ६-७). फोटो क्र. ६ च्या आकाराचा पेन स्टँड बनविण्यासाठी साधारण ८० कड्या लागतात. चौरस पुठ्ठयाऐवजी त्रिकोन, पंचकोन इत्यादी आकारही घेऊ शकता.

पेन स्टँड प्रकार २ - कृती :

३)एक चौरस किंवा गोलाकार पुठ्ठा घ्या (पेन स्टँड ज्या मापाचा हवा आहे त्यानुसार पुठ्ठयाचे माप घेणे). त्यावर कागदाचा/पुठ्ठयाचा सिलिंडर किंवा टाकाऊ प्लास्टिकची बाटली चिकटवा. (फोटोमध्ये टिश्यू पेपर रोल च्या आतील गोलाकार पुठ्ठा वापरला आहे). त्यावर फोटो मध्ये दाखविल्याप्रमाणे आईस-क्रीमच्या काड्या चिकटवा. (फोटो ८-१०)

४) अशा रीतीने गोलाकार पेन स्टँड तयार होईल. फोटो क्रमांक १०च्या आकाराचा पेन स्टँड बनविण्यासाठी साधारण १४-१५ कड्या लागतात. त्याला रंग किवा सजावटीच्या वस्तू लावून आकर्षक बनवा. (फोटो ११-१२)

 

टीप : आईस-क्रीमच्या काड्या तुम्ही आईस-क्रीम खाल्ल्यावर साठवून ठेवू शकता किंवा हस्तकला निगडित दुकानातही मिळू शकतात.

-संपदा कुलकर्णी

[email protected]

कागदाचा वापर करून सोप्या पद्धतीने पेपर बास्केट कसे तयार करायचे वाचा आजच्या लेखात.

पेपर बास्केट