अंकाचे भांडण 

दिंनाक: 25 Jan 2019 15:01:55

अंक सारे शून्याला
एकदा चिडवू लागले
किंमत नाही म्हणून
शून्य रडू लागले
 
जो तो आपली किंमत
शून्याला सांगू लागला
मीच तुझ्यापेक्षा श्रेष्ठ
म्हणत रांगू लागले
 
शून्याला अंकांनी असे
बेजार करून सोडले
तू एकदम निरर्थक
म्हणून देवाकडे धाडले
 
देव म्हणे शून्याला तू 
कुठे आहेस रे छोटा
तुझ्यामुळे प्रत्येक अंक
होत असतो मोठा
 
मोठं करणारा दुसर्‍याला
छोटा कधीच नसतो
शून्य मग आनंदाने
गालातल्या गालात हसतो
 
- शरद ठाकर