हेगम

दिंनाक: 23 Jan 2019 15:14:08


हेगम हे एक व्हायोलिन सदृश्य पारंपरिक कोरियन तंतूवाद्य आहे. कांकांगी या नावाने ते लोकप्रिय आहे. त्याला एक उभा दांडा, एक लाकडी साउंडबॉक्स व दोन तारा असतात. हे वाद्य मांडीवर उभे धरून बो ने वाजवितात.

कोरियन संगीतात हे वाद्य प्रामुख्याने वापरले जाते. या वाद्याला दोनच तारा असल्या तरी त्यातून करुण आणि हास्यरसप्रधान स्वर निघू शकतात. हे वाद्य बनविताना सोने, दगड, दोरा, बांबू, वाळलेला भोपळा, माती, चामडे आणि लाकूड अशा आठ गोष्टींचा वापर केला जातो. म्हणून त्याला पेलियम (आठ आवाज) असेही म्हटले जाते. हेगम हे वाद्य गोरियो आणि जोसियन राजघराण्यांपासून त्यांच्याकडील विविध पारंपरिक समारंभ, उत्सव, परेड इ. ठिकाणी वापरले जात असे.

पूर्वी हे वाद्य दोन तारा छेडून वाजविले जात असे. आता या तारा खेचून त्यातून आवाज निर्माण केला जातो. १९६० पासून या वाद्यात विविध बदल केले जात आहेत.

-यशोधन जटार

[email protected].com

बंगालच्या रवींद्र संगीतात, भजनात व बंगाली लोकगीतात वाजवल्या जाणाऱ्या लाऊ(बंगाली एकतारा) या वाद्याविषयी माहिती वाचा खालील लेखात
लाऊ(बंगाली एकतारा)