मुळाक्षरांचे गाणे

दिंनाक: 22 Jan 2019 15:27:02


मुळाक्षरे म्हणजे शब्दांचा आत्मा. ही अक्षरे आल्याशिवाय शब्दच कळणार नाहीत. अक्षर जुळवून तर शब्द तयार होतात. मुळाक्षरे लक्षात राहण्यासाठीचे हे गीत फारच उपयोगी आहे. अभिनयातून मुलांचे क ते ज्ञ या अक्षरांचा सराव होतो व मनोरंजनही होते. 

 
कमळातील पाण्यातच राहिला
चा खराटा आम्ही नाही पाहिला
च्या गळ्यात घालायची माळ 
च्या घरात रांगते बाळ 
च्या चमच्यामध्ये औषधे ही पिऊ
ची छत्री घेऊन पावसात जाऊ
च्या जहाजात बसू कधीतरी 
च्या झबल्यामध्ये दिसेल ना परी 
चे टरबूज गोल गोल फिरे 
च्या ठशामध्ये शाई कोण भरे 
चे डमरू वाजे किती छान 
चे ढग दिसे कापसाचे रान 
चा बाण आकाशात गेला 
च्या नळावर पाणी पिऊ चला 
च्या हातामध्ये मोठी तलवार 
चा मोठा थवा जाई दूर फार 
च्या दरवाज्यामध्ये आहे कोण उभा 
च्या धरणामध्ये पाणी किती बघा 
चा पतंग उंच उंच फिरे 
च्या फणसामध्ये गोड गोड गरे
च्या बगळ्याची उंच उंच मान
चे भडंग लागे किती छान 
ची मगर पाण्यातच राही 
चे यमक कवितेत येई 
च्या रथाला चार चार घोडे 
चे लसूण भाजीत घालू थोडे
च्या वजनाचे आकारच वेगळे 
चे शहामृग मोठे मोठे बगळे 
च्या षटकोनाला बाजू कोन सहा 
च्या सशाचे मोठे कान पहा
चे हरिण चाली तुरू तुरू 
च्या बाळाला नका कोणी मारू 
क्ष चे क्षत्रिय पराक्रमी वीर
ज्ञ चे ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्‍वर 
पाठांतर सोपे झाले मुळाक्षरांचे 
चला रे गाऊ गाणे अक्षरांचे
 
 
-  मनिषा दिनेश कदम, सहशिक्षिका 
नवीन मराठी शाळा, पुणे