प्रत्येक शाळेचे आधारस्तंभ म्हणजे ‘शिक्षक’. शिक्षक ही अशी व्यक्ती आहे जी भविष्यातील आदर्श विद्यार्थी घडवते. असे विद्यार्थी जे पुढे जाऊन एक आदर्श समाज घडवतो किंवा घडवणार असतो. विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यातले नाते शब्दांत सांगता येईलच असे नाही.

प्रत्येक शिक्षक आणि प्रत्येक विद्यार्थी यांच्यात एक वेगळेच नाते असते. शिक्षक फक्त शिकवत नाही तर भविष्य घडवत असतात आणि विद्यार्थी फक्त शिकत नसतात तर स्वत: एक भविष्य म्हणून घडत असतात. त्युमळे शिक्षकाने फक्त शिकवायचे नसते तर आपला विषय आपल्या विद्यार्थ्याला नीट समजतोय की नाही त्या विषयात त्याला रस आहे, की नाही हे तपासायला पाहिजे आणि खरंच आजचे शिक्षक असेच आहेत.

पूर्वीच्या आणि शिक्षक विद्यार्थीमधला नाते आज बदलले आहे. पूर्वी विद्यार्थी शिक्षकांशी बोलायला घाबरायचे पण त्यांचा तेवढा मानही करायचे. त्यांच्याबद्दल आदर असायचा. प्रत्येक शिक्षकाला एक आदर्श विद्यार्थी घडवायचा असतो. त्यामुळे त्यांचे अथक प्रयत्न चालू असतात. आज पर्वीप्रमाणे  विद्यार्थी शिक्षकांना घाबरत नाहीत, पण असं नाही की, त्यांच्या मनात त्यांच्याबद्दल आदर नाही. पूर्वीप्रमाणेच आताही प्रत्येक विद्यार्थी आपल्या शिक्षकाचा आदरच करतो. पण फक्त परिस्थिती बदलत आहे. आता विद्यार्थी आणि शिक्षक यांचे एक मैत्रीपूर्ण नाते तयार होत आहे. नवीन काय होत आहे? काय येत नाही हे आपल्या शिक्षकांना सांगितले पाहिजे, जेणेकरून शिक्षक ही अधिक प्रयत्न करतील. दरवर्षी गुरूपौर्णिमा येते, त्या दिवशी शिक्षकांप्रती आदर व्यक्त करतो. पण फक्त त्याच दिवशी का? इतर दिवशी का नाही? प्रत्येकाने आपल्या गुरूंचा प्रत्येक दिवशी आदर केला पाहिजे. शिक्षकाने शिकवलेली गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, त्यांनी आपल्याला दिलेले ज्ञान नेहमीच लक्षात ठेवले पाहिजे.

सर्व विद्यार्थी म्हणतात, ‘शिक्षक रागवतात, कडक आहेत.’ पण त्यांना हे कळत नाही की, शिक्षक आपल्या चांगल्यासाठी ओरडतात. शिक्षक आपल्याला खूप चांगले ज्ञान देत असतात ते आपण कधीच समजून घेत नाही. आपण फक्त ऐवढचं म्हणतो, ‘शिक्षक ओरडतील, मारतील.’ पण ते चांगल्यासाठीच असते. म्हणून मला वाटतं शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातले नाते कधीही न संपणारे, अतुट व चांगले असले पाहिजे. प्रत्येकाने आपल्या गुरूचा आदर केला पाहिजे.

- श्रावणी महाडीक

इ.८वी, शि. प्र. मं. म. मा. शाळा, निगडी