आम्ही शिक्षक

दिंनाक: 05 Sep 2018 17:55:25


आम्ही शिक्षक 

विद्यार्थी हा आमचा गुरु,

त्याच्याकडून अनेक गोष्टी शिकण्यासारख्या असतात,

तो शिकवतो आम्हाला शिक्षा मिळूनही चेहऱ्यावर आपुलकीचं हसू ठेवायला,

तो शिकवतो आम्हाला आमच्या चुका 

दुरुस्त करायला,

तोच शिकवतो आम्हाला एकाच धड्या कवितेचे दरवर्षी नवे अर्थ लावायला,

तो शिकवतो कितीही कामाच्या रगाड्यात

संयमी राहायला,

तो शिकवतो आईचे प्रेम, वडिलांचे कठोरपण

मित्राची सहानुभूती,हृदयातील निर्व्याज मायेचा झुळझुळ वाहणारा झरा कसा असतो ते,

आणि  तो होतो आमचा मायबाप,

शिक्षक म्हणून अभिमानाने वावरताना

आम्ही त्याच्याच तर भरवशावर वाटचाल

करतो,

त्याने मनात आणले तर तो शिट्ट्या ,

टाळ्या,वेगवेगळ्या विशेषणांनी  हद्दपार

करू शकतो आम्हाला वर्गातून,

पण नाही ,विद्यार्थी कधीच नसतो वाईट,धूर्त

आणि लबाड,नाही कधी स्वार्थी,

शिक्षकां वरून जीव ओवाळून टाकायला असतो माझा विद्यार्थी सदैव तयार,

आज शिक्षक दिनाच्या दिवशी माझ्या या

दैवताला माझा विनम्र नमस्कार!!!!!

 

-चारुता प्रभुदेसाई

[email protected]