‘बाहुल्या’ लहान मुलांचे आवडते आर्कषण. बाहुल्यांशी गप्पा गोष्टी करणं हा तर त्यांचा आवडता खेळ. पण आज कार्टून आणि गेम्सच्या जगात हा खेळ खेळणं मुलं विसरत असताना ‘शिक्षणविवेकने’ या लहानग्यांना पुन्हा बाहुल्यांच्या जगात नेले. निमित्त होते शिक्षणविवेक आयोजित ‘आंतरशालेय पपेट सादरीकरण स्पर्धेचे.’

पपेट शो या नामशेष होत चाललेल्या कलेची मुलांना ओळख व्हावी, या खेळाची मजा त्यांनी स्वत: अनुभवावी या उद्दशेने पूर्वप्राथमिक, प्राथमिक आणि माध्यमिक अशा तीनही गटांतील विद्यार्थ्यांसाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ३० ऑगस्ट ते १ सप्टेंबर, २०१८ या कालावधीत ही स्पर्धा स्वा.वीर सावरकर अध्यासन केंद्राच्या सभागृहात मोठ्या उत्साहात संपन्न झाली.

४६ स्पर्धक गट या स्पर्धेत सहभागी झाले होते. त्यात रानडे बालक मंदिर, न्यू इंग्लिश मिडीयम स्कूल, डे. ए. सो. पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक विद्यालय, मा. स. गोळवलकर गुरुजी विद्यालय, शि. प्र. मंडळी मुलींची शिशुशाळा, शि. प्र. मंडळी मराठी माध्यम निगडी, शि. प्र. मंडळी इंग्रजी माध्यम निगडी, एम. व्ही. एम. इंग्लिश मिडीयम स्कूल, कै. वा. दि. वैद्य मुलींची प्राथमिक शाळा, एस. पी. एम. प्रायमरी स्कूल, एस. पी. एम. इंग्लिश मिडीयम स्कूल, नवीन मराठी शाळा, शिशुविहार एरंडवाणा, प्रा. म. ना. अदवंत प्राथमिक विद्यालय, शिशुविहार प्राथमिक शाळा कर्वेनगर, न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग, नू. म. वि. मुलींची शाळा, मॉडर्न हायस्कूल, रेणुका स्वरूप प्रशाला, अहिल्यादेवी हायस्कूल फॉर गर्ल्स, शिशुविहार विद्यापीठ या शाळांचे विद्यार्थी आणि शिक्षक तसेच पालकही सहभागी झाले होते.

ग्लोव्ह पपेट्स, स्टिक पपेट्स, एन्व्हलप पपेट्स असे पपेट्सचे अनेक प्रकार यावेळी पाहायला मिळाले. स्वतः बनवलेल्या पपेट्सच्या माध्यमातून आपली गोष्ट सादर करताना विद्यार्थ्यांना मिळणारा आनंद द्विगुणीत करत होता. पूर्वप्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षकांनी आणि पालकांनी विद्यार्थ्यांची पुरेपूर तयारी करून घेतली होती, हे त्यांच्या सादरीकरणातून दिसून येत होते. उडणारे पक्षी, हलणारे झाड, पाण्याचे थेंब, पेन्सील, पुस्तक असे अनेक नवीन प्रकारचे पपेट्स यावेळी तयार केले होते. विशेष म्हणजे बाजारातून विकत आणलेल्या पपेट्सपेक्षा नाविन्यपूर्ण कल्पना वापरून केलेले पपेट्स सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. अगदी पूर्व प्राथमिक गटापासून माध्यमिक गटांतील विद्यार्थ्यांची स्पर्धेची चुरस जाणवत होती. पाऊस आणि निसर्ग या विषयाला अनुसरून एकापेक्षा एक उत्तम सादरीकरण, नवीन कथा, निसर्गाची गाणी, अस्खलित शब्दफेक, प्रचंड आत्मविश्वास, हालचालीतील सुसूत्रता अशा एक ना अनेक गोष्टींकडे लक्ष ठेवत विद्यार्थी सादरीकरण करत होते. आपले संवाद लक्षात ठेवणे, आवाजातील चढ उतारानुसार बोलणे आणि त्यावेळी आपलेच पपेट हलवणे ही कसरत विद्यार्थी अगदी सहजतेने करत होते. शिक्षकांचाही उत्साह वाखाणण्याजोगा होता. शिक्षकांना सादरीकरणाची संधी नसली तरी संवाद आणि काव्य लिहिण्याच्या माध्यमातून त्यांनी स्पर्धेत सहभाग घेतला. स्वरचित लेखन आणि काव्य यासाठी शिक्षकांचेही परीक्षण केले गेले. 

तीन दिवसांची ही मनोरंजनाची मेजवानी सर्वांसाठी आनंददायी होती. मान्यवर परीक्षकांनी प्रत्येक गटातून तीन क्रमांक काढले. सर्वोत्कृष्ट लेखन व काव्य लिहिणाऱ्या शिक्षकांचाही यावेळी गौरव करण्यात आला. सर्व विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकांचे उत्तम प्रयत्न लक्षात घेऊन सहभागी सर्वांना प्रमाणपत्रे देण्यात आली. तीन दिवसांची अनोखी स्पर्धा सर्व शाळांना, मुख्याध्यापकांना, शिक्षकांना, पालकांना, विद्यार्थ्यांना आणि परीक्षकांनाही अविस्मरणीय ठरली.

'शिक्षणविवेक आयोजित ' आंतरशालेय पपेट सादरीकरण स्पर्धा ' निकाल -

 

पूर्वप्राथमिक विभाग - दि. ३० ऑगस्ट, २०१८.

प्रथम क्रमांक :- शि. प्र. मं मराठी माध्यम, निगडी.

१. समिक्षा काजळे

२. शांभवी देसाई

३. मधुरा जेवळीकर

द्वितीय क्रमांक:- शि. प्र. म. मुलींची शिशुशाळा.

१. जिया मंगेश धुमाळ

२. शर्वरी निलेश वडनेरे

३. आराध्या प्रदीप आग्रे

तृतीय क्रमांक :- मा. स. गोळवलकर गुरुजी विद्यालय.

१. रुद्र दातार

२. ओवी वाडेकर

३. रिद्धी केदारी

स्वरचित लेखन :-

मा. अमिता दाते ( मुख्याध्यापक, रानडे बालक मंदिर )

 

प्राथमिक विभाग - दि. ३१ ऑगस्ट, २०१८.

प्रथम क्रमांक :- शि. प्र. मं मराठी माध्यम, निगडी.

१. मानसी गावंडगावे

२. श्रेयस राळे

३. शौर्य जाधव

द्वितीय क्रमांक:- कै. वा.दि. वैद्य मुलींची शाळा.

१. अनुष्का चाफेकर

२. किमया घाडी

३. सुरभी पाटील

तृतीय क्रमांक :- न्यू इंग्लिश मिडीयम स्कुल.

१. वरद पाटणकर

२. वेदांत पिंपळकर

३. श्रेया वैद्य

स्वरचित लेखन :-

 मा. अर्चना देव  (शिक्षिका, नवीन मराठी शाळा, पुणे)

 

 माध्यमिक  विभाग - दि. १ सप्टेंबर  २०१८

प्रथम क्रमांक :- न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग

१. सौमित्र सबनीस.

२. आर्यन देव.

३. निनाद साळी.

 द्वितीय क्रमांक:- अहिल्यादेवी हायस्कूल फाॅर गर्ल्स 

१. हिरण्याक्षी पवार.

२. रिद्धी मांढरे.

३. सई नानगुडे.

 तृतीय क्रमांक :- शिशुविहार विद्यापीठ

१. अंकिता भागवत.

२. वैशाली घोडके.

३.प्रांजली येरपले.

स्वरचित लेखन :-

मा. चंचला धार्मिक. (रेणूका स्वरुप प्रशाला)

 

सर्व विजेत्या विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकांचे हार्दिक अभिनंदन.

-प्रतिनिधी

[email protected]