साहित्य : २२५ ग्रॅम मक्याचे दाणे (स्वीट कॉर्न), हिरव्या मिरच्या, १ चहाचा चमचा लिंबाचा रस, १/२ वाटी खवलेला नारळ, बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीपुरती साखर, हळद, मीठ, फोडणीसाठी तेल, कडीपत्त्याची पाने, मोहरी, जिरे, हिंग, बटर किंवा तूप, ब्रेड.

कृती : मक्याचे दाणे (स्वीट कॉर्न), हिरव्या मिरच्या, मीठ, साखर, लिंबाचा रस घालून भरडून घ्या.

गॅसवर भांडे ठेवून त्यात थोडं तेल टाकून त्यात जीरे-मोहरी, चिरलेल्या हिरव्या मिरच्या, कढीपत्त्याची पाने, हिंग टाका. नंतर त्यात भरडलेलं मिश्रण टाकून चांगले हलवून घ्या.

भांड्यावर झाकण ठेवून ३-४ मिनिटे ठेवा. हे मिश्रण डिशमध्ये काढून त्यावर कोथिंबीर व खवलेला नारळ पेरा.

झाला मक्याचा चवदार उपमा तयार..!

हा तयार उपमा २ ब्रेड स्लाईसेसच्या मध्ये भरून बटर किंवा तूप लावून टोस्टरमध्ये भाजून घ्या व गरमागरम सॉस किंवा चटणीसोबत खायला द्या.

हे तयार आहे तुमचे स्वीट कॉर्न सँडविच.

 

व्हेजिटेबल सँडविच