शिक्षणविवेक सर्व शाळांमध्ये वेगवेगळ्या उपक्रमांतून विद्यार्थांसाठी सतत प्रयत्नशील आहे. या आठवड्यात एस. पी. एम. निगडी आणि मा.स.गोळवलकर गुरुजी विद्यालय या शाळांमध्ये शिक्षणविवेक आयोजित उपक्रम घेतले गेले.
 
शिक्षण प्रसारक मंडळींच्या निगडी शाळेतील इंग्रजी माध्यम आणि मराठी माध्यमात शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी दि. ३१ जुलै रोजी शिक्षणविवेक टीमने दिवसभर वेगवेगळे उपक्रम घेतले. पपेट शो, सुरक्षित स्पर्श-असुरक्षित स्पर्श, हस्तलिखित तयार करणे, ताणतणाव व्यवस्थापन अशा चार उपक्रमांचे सादरीकरण दोन्ही विभागातील शाळांमध्ये झाले. पूर्वप्राथमिक विभागातील मुलांपासून १० वीच्या मुलांपर्यंत सर्वांना या कार्याशाळांचा लाभ घेता आला. चित्रा नातू, सायली सहस्त्रबुद्धे, अक्षय वाटवे, अदिती दाते, रुपाली निरगुडे यांनी घेतलेल्या उपक्रमात विद्यार्थ्यांनी छान प्रतिसाद दिला. उमा घोळे, शोभा जोशी, मृणाल धसे, अलका कोरपे, मोनिका काळे या शिक्षक प्रतिनिधींनी केलेले नियोजन उत्तम होते. दोन्ही विभागातील मुख्याध्यापकांनीही सहकार्य केले.
 
बाहुल्यांचा नाच आणि ग्रॅनीची मज्जा घेत गुरुवार, दि. २ ऑगस्ट रोजी मा. स. गोळवलकर गुरुजी विद्यालय पुणे येथील विद्यार्थ्यांनी पपेट शो पहिला. मुख्याध्यपिका कल्पना धालेवाडीकर आणि शिक्षक प्रतिनिधी प्रज्ञा पोतदार यांनी मुलांना शिक्षणविवेक मासिकातर्फे होणाऱ्या या उपक्रमाची माहिती सांगितली. शिक्षणविवेक उपक्रम प्रमुख रुपाली निरगुडे आणि आदिती दाते यांनी पपेट शोचे सादरीकरण केले. दुसरीकडे इ. ३ री आणि ४ थीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘सुरक्षित स्पर्श – असुरक्षित स्पर्श’ या सत्राचे आयोजन शिक्षणविवेकतर्फे करण्यात आले होते. मार्गदर्शक सायली सहस्त्रबुद्धे याची ओळख शिक्षक प्रतिनिधी नेहा जोशी यांनी करून दिली. Activity आणि powerpoint presentatation च्या माध्यमातून मांडलेला हा विषय विद्यार्थ्यांना समजला. या वेळी ‘वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पहिले तर सुरक्षित व असुरक्षित स्पर्श लक्षात येतील’ असे विद्यार्थ्यांनी सांगितले. पूर्व-प्राथमिक आणि प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांसाठी घेतलेले हे उपक्रम मुलांसोबतच शिक्षकांनाही आवडले. 
 
-रुपाली निरगुडे