साहित्य : नायलॉनची जाळी (बोरं किंवा सफरचंद अशा फळे पॅकिंगची जाळी) जुन्या जेलपेनच्या रिफिल्स, सेलोटेप, रिबीन, कात्री, हिरवा कागद, गम.

कृती : १) नायलॉनच्या जाळीचे आयाताकृती पट्टे, हव्या त्या मापाने कापून घ्या.

२) काही छिद्रांमधून बॉलपेनचे रिफिलचे टोक अडकवून घ्या.

३) नायलॉन खेचला जातो. तो मधोमध दुमडून गुंडाळून घ्या. आपोआप फुलाचा मध्य तयार होत जाईल.

४) अशाचप्रकारे जर अजून एखादा रंग वापरला, तर दोन रंगीत फुले तयार होतील.

५) जाळी ओढून पूर्ण रिफील झाकून टाकता येईल.

६) हिरव्या क्रेप टेप किंवा कागदाने पानांचे आकार कापा व सुशोभित करा. ही फुले नायलॉन व प्लास्टिकची असल्यामुळे पाने काढून धुतासुद्धा येतील.

असे वेगवेगळ्या रंगांचे गुच्छ बनवून वापरता येतील. शाळेतील कार्यक्रम हळदी-कुंकू, सण-समारंभात पाहुण्यांच्या स्वागतासाठी यांचा चांगला उपयोग करता येईल.

चला तर, बघा करून. नायलॉन फुले घरच्या घरी.

- अर्चना जोशी

[email protected]