पपेट शो

दिंनाक: 24 Jul 2018 18:31:05


इ. १ली व २ रीच्या छोट्या दोस्तांसाठी मनोरंजनातून संदेश देण्यासाठी अनेक शाळांमध्ये शिक्षणविवेक पपेट शोचे सादरीकरण करत आहे. सादरीकरणात गाणी आणि गोष्टींमधून विद्यार्थ्यांचे मनोरंजन केले जाते. गाण्याच्या तालावर नाचणाऱ्या आणि संवाद बोलणाऱ्या बाहुल्या पाहून मुलांना गंमत वाटते. मुलांसोबत शिक्षकही हा पपेट शो एन्जॉय करतात. बाहुल्यांच्या संवादाला मुलांकडून छान प्रतिसाद मिळतो. पपेट शोनंतर वेगवेगळ्या प्रकारचे पपेट्स दाखवून त्यांची माहिती सांगण्यात येते.

न्या. रानडे बालक मंदिर येथे दि. १८ जुलै रोजी सादरीकरण झाले. मुख्याध्यापिका अमिता दाते आणि शिक्षणविवेक प्रतिनिधी शिल्पा पराडकर यांनी उत्तम नियोजन केले होते. गुरुवार, दि. १९ जुलै रोजी नु. म. वि. शिशुशाळा येथे पूर्वप्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांसाठी सादरीकरण करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापिका दीपा कुलकर्णी आणि शिक्षणविवेक प्रतिनिधी मानसी सरनाईक यांनी पूर्वप्राथमिक विभागातील मुलांसोबत स्वतःही पपेट सादरीकरणाचा आनंद घेतला. नू. म. वि. मराठी शाळा येथे दि. २४ जुलै रोजी मुख्याध्यापिका अशा नागमोडे आणि प्रतिनिधी प्राजक्ता पारेकर यांनी पपेट सादरीकरण स्पर्धेत सहभागी होण्याचे आश्वासन दिले. या कार्यक्रमात शिक्षणविवेक कार्यकारी संपादक डॉ. अर्चना कुडतरकर उपस्थित होत्या, तर उपक्रम प्रमुख रुपाली निरगुडे आणि शिल्पकार चरित्रकोशच्या सहसंपादक चित्रा नातू-वझे यांनी पपेट शो चे सादरीकरण केले.

-रुपाली निरगुडे

[email protected]