ओरोगामी मोर

दिंनाक: 10 Jul 2018 15:21:04


साहित्य : कार्डपेपर, कात्री, गम, टिकल्या इत्यादी.

कृती : 1) आपल्याला हव्या त्या रंगाचा चौकोनी कार्डपेपर दुमडून आकृतीत दाखवल्याप्रमाणे मोराचे धड बनवून घ्या.

2) साधारण मोरासाठी घेतलेल्या कागदाच्या दुप्पट आकाराचा कागद पिसार्‍यासाठी घ्या.

3) या कागदाचे झिगझॅग फोल्डस् करा (Fan Fold). एकत्र खालील बाजूस जोडून घ्या. पिसारा तयार.

4) तयार पिसार्‍याला मोराचे धड मध्यावर चिकटवून घ्या.

5) अजून एका छोट्याशा पट्टीचा आकृतीत दाखवल्याप्रमाणे तुरा बनवून घ्या. मोराच्या डोक्यावर चिकटवा व वाळू द्या.

6) पिसारा व मोराचा डोळा टिकल्यांच्या साहाय्याने सुशोभित करा.

7) तुमच्या शाळेच्या प्रकल्पासाठी, वर्ग सजवण्यासाठी या मोराचा उपयोग करता येईल.

8) 2D प्रकारातील भेटकार्ड अथवा चित्र काढून भेट देता येईल.

- अर्चना जोशी

[email protected]