५ जून  ... जागतिक पर्यावरण दिन. यंदाच्या या पर्यावरणदिनाचा यजमान आपला भारत देश आहे आणि "प्लास्टिक प्रदूषणावर मात" हे या वेळचे घोषवाक्य आहे. 

पर्यावरण जपण्याकरता अनेक कायदे अस्तित्वात आहेत. परंतु युरोप, अमेरिका या देशांतील नागरिकांप्रमाणे आपल्याला त्याचा धाक वाटत नाही. पर्यावरण कायद्यांच्या अंमलबजावणीसाठी आपणही प्रयत्न केले पाहिजेत. पर्यावरण हे सर्वांचेच आहे आणि कुणाचेही नाही, अशी सध्या स्थिती आहे. पर्यावरणाची नासाडी करून झटपट श्रीमंत होता येते. त्यामुळे जंगले, वने, वाळू, जमिनी, नद्या सारे प्रदूषित आणि नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. आणि मग तिथे बकालपणा, नापिकी आल्याची अनेक उदाहरणे जगभरात आहेत. म्हणून पर्यावरणीय सुसंस्कृतपणा आपल्या अंगी बाणावा म्हणून पर्यावरणाची प्रतिज्ञा आपण रोज घेण्याची गरज आहे.

प्रतिज्ञा पर्यावरणाची - 

पर्यावरण माझे जीवन आहे. पर्यावरणाचे संवर्धन आणि रक्षण करणे, हे माझे कर्तव्य आहे. निसर्गावर माझे प्रेम आहे. निसर्गातील सर्व सजीवांबद्दल मला सहानुभूती आहे. वने, जलाशये, नद्या, जमीन आणि सर्व वन्यजीव यांच्यासह नैसर्गिक घटकांचे संवर्धन करण्याची मी प्रतिज्ञा घेत आहे. माझे पर्यावरण प्रदूषणरहित, स्वच्छ, सुंदर आणि प्लास्टिक मुक्त राहण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहीन. पर्यावरणविषयक जाणीव आणि जागृती समाजात सर्वांना करून देण्यासाठी मी वचनबद्ध आहे. नैसर्गिक पर्यावरणाचा मी सदैव ऋणी राहीन.

   जय हिंद ! जय भारत ! जय पर्यावरण ! 

 

-स्वाती दाढे

[email protected]