मस्त पावसाळा सुरू झाला आहे. कधी जोराचा तर कधी रिम-झिम पाऊस पडत असतानाच आपल्या चटपटीत पदार्थांची आठवणं नाही आली तर नवलच! त्यासाठीच कमी वेळात होणारी ‘ब्रेडचा झटपट वडा’ ही रेसिपी नक्की ट्राय कराच!

साहित्य : ब्रेड स्लाईस आठ ते दहा, उकडलेले बटाटे, तिखट मीठ, चवीनुसार दाणेकुट खोबरे प्रत्येकी एक चमचा, अर्धा चमचा भाजलेली खसखस, तेल, कोशिंबीर, काजूचे तुकडे, चिंचेचा सॉस.

कृती : बटाटे किसून घ्यावेत, त्यात तिखट, मीठ, खसखस खोबरे, दाणे कूट, काजूचे तुकडे आणि कोशिंबीर घालून मिश्रण व्यवस्थित मिसळून घ्यावे. ब्रेड स्लाइस वाटीने गोल कापून घ्याव्यात आणि त्यावर तयार केलेल्या सारणाचा लहान गोळा ठेवावा. ब्रेड स्लाईसच्या कडांना बोटाने पाणी लावावे आणि वरून दुसरी स्लाईस ठेवावी. कडा नीट दाबून घ्याव्यात जेणेकरुन सारण बाहेर पडणार नाही. तव्यावर तेल पसरून तयार केलेले वडे दोन्ही बाजूने खरपूस भाजून घ्यावे. तयार झालेेले बे्रडचे बटाटे वडे चिंचेच्या सॉस बरोबर खावेत.

- नीशा कोतावार

[email protected]