महाराष्ट्राची भूमी संतांच्या वास्तव्याने पुनीत झाली आहे,इथे या पुण्याईची छत्र सावली सर्वाना मिळाली आहे, महाराष्ट्रात पर्वतराजी,जंगले,कडेकपारी,नद्या समुद्र यांनी समृद्ध असे पर्यावरण आहे,इथल्या मातीतून मोती पिकतात आणि कणसाला लगडलेले मोती सुफलीत मातीला कृतकृत्य करतात,रांगड्या सह्याद्रीची हाक,घुमणारी समुद्राची गाज, हे लक्ष वेधून घेतात,या भूमीने अनेक वीर,शूर ,नेते,नर नारी दिल्या,ज्यांनी महाराष्ट्राचे नाव जगात दुमदुमत ठेवले,या महाराष्ट्राचा विकास तारा सम्पूर्ण अंधार नष्ट करतो आणि महाराष्ट्रच्या उज्ज्वल भविष्याचे पडघम दिशादिशात गाजत राहतात.

ऑडिओ : ही भूमी महाराष्ट्राची

|| महाराष्ट्रगीत ||

ही भूमी महाराष्ट्राची

ही भूमी संतजनांची

ही माय माऊली, छत्र साऊली, भूमी पुण्याईची ||धृ||

हे पर्वत हिरवी राने

सरितांचे मंजुळ गाणे

हा विशाल सागर गाज ऐकवी अदम्य सामर्थ्याची ||१||

ही सुफलित येथे माती

कणसात लगडले मोती

हा सह्यागिरी रांगडा बोलतो वचने पराक्रमाची ||२||

नररत्ने नारीशक्ती

ज्ञानाचे दीप उजळती

हा विकासतारा सर्व भेदितो पटले अंधाराची ||३||

 

चारुता प्रभुदेसाई 

[email protected]