राष्ट्रीय विज्ञानदिनानिमित्त शिक्षणविवेक आणि कुतुहूल यांच्या संयुक्त विद्यमाने विज्ञान नवसंकल्पना स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. ८ वी ते 9 वी वयोगटातील तृतीय क्रमांक सृष्टी सोमनाथ इंदोरे हिच्या देशाच्या सुरक्षतेसाठी फिरत्या झुल्याचा वापर आणि राधिका चांदगुडे हिच्या शिक्षकांचे डस्टर या दोन प्रयोगांना विभागून देण्यात आला आहे. या दोनही प्रयोगाविषयी माहिती एकत्र देत आहोत.

देशाच्या सुरक्षतेसाठी फिरत्या झुल्याचा वापर

 

प्रयोगाचा उद्देश-

१. कौशल्य विकासाला चालना देणे

२. देशसेवेसाठी साहित्याची निर्मिती करणे

३. रोजगार व स्वयंरोजगार निर्माण करणे

४. मुलांच्या सुप्त गुणांना वाव देणे

५. मुलांमध्ये राष्ट्रभक्ती व वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण करणे.

वैज्ञानिक तत्त्व – centrifugal force झुला गतिमान होईल विद्युत उर्जेचे रुपांतर

प्रयोगाचे मुख्य फायदे- यांत्रिक उर्जेत होऊन झुला वर्तूळाकार फिरतो

१. भारतीय सीमेवर फिरत्या झुल्याचा वापर करून वेगवेगळ्या कोनात वेगवेगळ्या टप्प्यावर टेहाळणी करणे.

२. भविष्यात कौशल्य विकास कार्यक्रमाअंतर्गत मुले स्वत:चा लघुउद्योग निर्माण करून आर्थिकदृष्ट्या सक्षम बनतील.

३. या प्रकल्पामुळे सैन्यबळ कमी लागेल. यातून सैनिकांची तसेच देशाची देखील सुरक्षा होईल.

४. air raid shelter च्या सहाय्याने झुल्याला परकीय आक्रमणांपासून सुरक्षित ठेवता येईल.

५. प्रत्यक्ष वापरासाठी झुल्याला फिरवण्यासाठी सौर ऊर्जेचा वापर करता येऊ शकेल.

सृष्टी सोमनाथ इंदोरे   

९ वी   

म.ए.सो. राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा.

 

शिक्षकांचे डस्टर

शिक्षकांचे डस्टर व खडू चे ओझे कमी होण्यासाठी जर डस्टरलाच खडूसाठी छोटा बॉक्स बसून त्यात ड्रॉवर बसून त्यात ड्रॉवर तयार केला. तर त्यामुळे त्यानेच पुसताही येईल व त्यातच खडू ठेवता येतील.

-राधिका चांदगुडे  

८ वी

म.ए.सो राणी लक्ष्मीबाई

८ वी ते 9 वी वयोगटातील द्वितीय क्रमांक प्राप्त विनायक गोळे या विद्यार्थ्याने घरातील वस्तूंचा वापर करून कुलर तयार केला आहे. तुम्ही करू शकता. कसे? वाचा खालील लिंकवर 

कुलर