नमस्कार, आज शिबिराचा शेवटचा दिवस असूनही सगळे बालचमू उत्साही आणि आनंदी दिसत होते. आज शिबिरात काय करणार याची उत्सुकता सगळ्यांनाच होती. मुलांनी आज कांदा, बटाटा, टोमॅटो असे काही साहित्य आणले  होते. त्या साहित्याबद्दलची माहीती सांगायची होती. प्रत्येकजण आपण आणलेल्या वस्तूचे उपयोग आठवून सांगत होते. नंतर सगळ्यांनी ताईंच्या मदतीने भेळ तयार केली. 'भेळ कशी तयार करायची' याची कृती मुलांनीच सांगितली.  कांदा, टोमॅटो, मुरमुरे, फरसाण, तिखट, मीठ, चिंचेचं पाणी एकत्र करून भेळ तयार केली. 
सर्वांनी भेळीचा आस्वाद घेतला. समारोपाच्या कार्यक्रमाला सर्व पालक उपस्थित होते. पालक आल्यावर रुपाली निरगुडे यांनी शिबीरात सत्र घेणाऱ्या सर्व ताईंचा परिचय करून दिला.  शिक्षणविवेकबद्दल  आणि शिक्षणविवेक प्रकाशित दोन गोष्टींच्या पुस्तकांची माहिती सांगितली. त्यानंतर शिक्षणविवेकच्या कार्यकारी संपादक डॉ.अर्चना कुडतरकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. न्या. रानडे बालक मंदीर शाळेने शिबीरासाठी सर्वतोपरी सहकार्य केल्याबद्दल शाळेला एक भेटवस्तू देण्यात आली. शिक्षणविवेक प्रतिनिधी व शाळेच्या शिक्षिका शिल्पा पराडकर यांनी भेटवस्तू स्वीकारली. पालकांनी शिबिराबद्दल त्यांचे मनोगत व्यक्त केले. मुलांनीसुद्धा त्यांनी 'शिबिरात काय काय मज्जा केली', ते संगितले. सगळ्या मुलांना त्यांनी तयार केलेल्या वस्तूंची भेट देण्यात आली. शाळेच्या मुख्याध्यापिका आमिता दाते व सर्व पालकांचे आभार मानून शिक्षणविवेक आयोजित उन्हाळी शिबिराची सांगता झाली.
- प्रतिनिधी