शिक्षणविवेक आयोजित उन्हाळी शिबिर म्हणजे भन्नाट आनंद देणाऱ्या ऍक्टिव्हिटी. आज शिबिरात मुलांना भेटले चिंटू आणि मिनी, 'पपेट शो'च्या निमित्ताने. गाण्यावर नाच करणारी पपेटस् पाहून मुलांना खूप आनंद झाला. आजच सत्र सुरू झाल्यावर रुपालीताईंने मुलांना 'जोडी शोधा' हा नवीन खेळ शिकवला. सुरुवातीला थोडीशी गोंधळलेली मुले नंतर मात्र व्यवस्थित खेळू लागली. खेळ खेळून झाल्यानंतर मुलांनी खूप शांतपणे, अजिबात गडबड न करता 'पपेट शो' बघितला. न्या.रानडे बालक मंदिर शाळेतील शिक्षका प्राजक्ता बेंद्रे आणि शिक्षणविवेकच्या रुपाली निरगुडे यांनी पपेटद्वारा गोष्टीचे सादरीकरण केले. आई, बाबा, चिंटू, मिनी, आजी, कासव, ससा, मनीमाऊ अशा अनेक पपेटस् मुलांनी पाहिल्या.
त्यानंतर रुपालीताईंने सांगितल्याप्रमाणे मुलांनी पपेटस् तयार केली. प्रत्येकाच्या गोष्टीतले एक-एक पपेट तयार झाले. मग आपापली पपेटस् ताईंकडे देऊन सगळे पुन्हा खेळायला तयार झाले. त्यांचे नेहमीचं आवडतं गाणं 'अशी खीर बनवू या...' आज मुले स्वतःच म्हणाली.

-प्रतिनिधी

[email protected]

 

उन्हाळी शिबिर : दिवस तिसरा(रानडे बालक मंदिर)