कुलर

दिंनाक: 20 Apr 2018 11:40:01


राष्ट्रीय विज्ञानदिनानिमित्त शिक्षणविवेक आणि कुतुहूल यांच्या संयुक्त विद्यमाने विज्ञान नवसंकल्पना स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. ८ वी ते 9 वी वयोगटातील द्वितीय क्रमांक आलेल्या विनायक गोळे या विद्यार्थ्याने कुलर तयार केला आहे. त्याच्या या प्रयोगाविषयी माहिती देत आहोत.

साहित्य – लाकूड, मोटार, पंखा, झाडूचे तुकडे, पत्र्याचा एक छोटा डबा, कात्री, चिकटपट्टी.

कृती- लाकडाचे चार तुकडे करा. त्यातल्या दोन तुकड्यांना छोट्या दोन खिडक्या करा. त्या खिडक्याला झाडूचे तुकडे लावा. कारण थंड हवा येईल. चार तुकडे घेउन ते एकमेकांना जोडा व एक चौकोनी बॉक्स तयार करा. व त्या बॉक्सच्या बाजूच्या साईडला खिडक्या पडलेल्या फळ्या लावा व खालच्या बाजूला पत्र्याचा डब्बा लावा. त्या बॉक्सच्या आतमध्ये मोटार लावा व त्या मोटारला पंख लावा व त्या पुढच्या बाजूला मोठी  भोक पाडा. कारण हवा बाहेर येईल. त्या नंतर आतमध्ये पाणी ओता व वरच्या बाजूला छोटी फळी लावा व पंख चालू करा. हा प्रयोग घरी करू शकता. प्रयोगाची कृती आकृती चित्रात आहे.

फायदे- १. थंड हवा बाहेर येणे.

      २. आपण पाणी जर गरम ओतले तर गरम हवा येईल.

      ३. लाईट गेली तरी बॅटरी वर करू शकतो.

 

-विनायक शिवाजी गोळे

८ वी     

 भावे हायस्कूल, पुणे

८ वी ते 9 वी वयोगटातील प्रथम क्रमांक आलेल्या सिद्धार्थ काकडे आणि मंदार कोकरे यांच्या डोके दाबण्याचे विजरहित यंत्र या प्रयोगाविषयी माहिती  घ्या खालील लिंकवर 

डोके दाबण्याचे विजरहित यंत्र