नमस्कार ,
आज शिबिर सुरू व्हायच्या आधीच शिबिराच्या ताई आल्याची कुणकुण सगळ्या मुलांना लागली होती. 'पुस्तक माझे' , 'रंग-रांगोळी' ही सत्र झाल्यावर आज 'बनवू शिल्पे' या सत्राचे आयोजन होते. आज रुपालीताईंनी 'चिमणी उडी' हा नवीन खेळ शिकवला. या नवीन खेळात मुले खूपच रमली होती. तरीही सर्वांना आवडलेले 'पपडम्-पायासम्' आणि 'पोस्टमन' हे खेळ खेळावेच लागले. न्यू इंग्लिश स्कूल शाळेतील कलाशिक्षक सुरेश वरगंटीवार सरांनी आजचे 'बनवू शिल्पे' हे सत्र घेतले. सुरुवातीला वरगंटीवार सरांनी मातीच्या नावापासून सुरुवात करून 'माती कशी भिजवायची ?' , त्यापासून शिल्पं कसं तयार करायचं, हे सांगितलं. मातीकामाच्या साध्या, सोप्या वस्तू सरांनी बनवून दाखवल्या. त्यांनी द्राक्षाचा घड, कॅडबरी या वस्तू बनवून दाखवल्या. त्यानंतर गटात विभागणी करून प्रत्येकाला मातीचे दोन दोन गोळे देण्यात आले. मुलांनी आपापल्या मातीच्या गोळ्यातून वस्तू तयार केल्या. मुले अगदी मन लावून वस्तू तयार करत होते. प्रसंगी मुलांनी वरगंटीवार सरांची मदत घेतली. वस्तू बनवून झाल्यानंतर रुपालीताईंनी 'देव दानव मानव' हा खेळ शिकवला. आणि नंतर रोजचे आवडीचे 'अशी खीर बनवू या...' हे गाणे मुलांनी स्वतःहून म्हटले. आपण बनवलेल्या वस्तू नीट जपून ठेवण्यास मदत केली. उद्या कायची उत्सुकता त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होती.

 

उन्हाळी शिबीर : दिवस दुसरा (रानडे बालक मंदिर)

 

-प्रतिनिधी 

[email protected]