राष्ट्रीय विज्ञानदिनानिमित्त शिक्षणविवेक आणि कुतुहूल यांच्या संयुक्त विद्यमाने विज्ञान नवसंकल्पना स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. ८ वी ते 9 वी वयोगटातील प्रथम क्रमांक आलेल्या सिद्धार्थ काकडे आणि मंदार कोकरे यांच्या डोके दाबण्याचे विजरहित यंत्र या प्रयोगाविषयी माहिती घेऊ..

आमचा प्रकल्प हे एक डोके दाबण्याचे विजरहित यंत्र आहे. त्याचे नाव M.S.300 आहे. याला चालवण्यासाठी फक्त वायुदाबाची गरज आहे.

साहित्य- पुठ्ठा, इंजेक्शन ३, फुगे ३, पांढरा रंग

कृती- आम्ही दोघांनी प्रथम पुठ्याच्या दोन पट्ट्या कापल्या व एक पट्टी आम्ही गोल आकार करून चिकटवली व नंतर दुसरी पट्टी यू आकारात कापली. म्हणजे असे तयार होईल. व त्यानंतर आम्हे ३ इंजेक्शन घेतली. व दोन बाजूला लावली व एक पाठीमागे लावले. सर्व इंजेक्शन आतल्या बाजूला तोंड करून लावली, व पुढून आम्ही फुगे लावले. आणि पट्ट्याला पांढरा रंग दिला व आमचा प्रोजेक्ट तयार झाला.

वैज्ञानिक तत्व- आपण शिकत आलो आहोत. की हवेमध्ये प्रचंड शक्ती असते. आमच्या प्रोजेक्टसाठी त्याची गरज आहे. वायुदाबामुळे आपल्याला जाणवते की आपल्या डोक्याची मसाज होत आहे.

त्यातून आम्ही काय शिकलो- विजेचा वापर न करता आपण नैसर्गिक वायू किंवा नैसर्गिक गोष्टींनी अशाच प्रकारच्या वस्तू बनवू शकतो. जे आपल्याला उपयुक्त आहेत.

सिद्धार्थ काकडे, मंदार कोकरे 

  ८ वी     

न्यू इंग्लिश स्कुल रमणबाग

 

विज्ञान नवसंकल्पना स्पर्धेत ५वी ते ७वी वयोगटातील तृतीय क्रमांक आलेल्या साईराज खाटपे आणि अथर्व गडकरी या विद्यार्थ्यांचा प्रयोग.

 GENETATING ELECTRICITY WITH LEMONS