अक्षरांची कार्डे तयार करणे. उदा. a, t, m, o, s  इ. वर्गातील मुलांचे गट तयार करणे. प्रत्येक गटाला 5 ते 7 कार्डे देणे. त्यांनी अक्षरकार्डाचे वाचन करून ती अक्षरे योग्य क्रमाने जुळवून जास्तीत जास्त शब्द तयार करावेत. जो गट जास्तीत जास्त शब्द तयार करेल, तो गट विजयी होईल. ही अक्षर कार्डे देताना सारखीच द्यावीत म्हणजे शब्दमर्यादा येते. खेळात समानता दिसते. दुसऱ्या फेरीच्या वेळी दुसरी अक्षरे मुलांना द्यावीत म्हणजे विद्यार्थी चुरशीने खेळ खेळतील व जास्तीत जास्त अर्थपूर्ण शब्द बनवण्याचा प्रयत्न करतील.

 

 

 

 

 


 

हे शब्द तयार केल्यावर तो शब्द वाचून त्याचा अर्थ मुलांनी सांगणे अपेक्षित आहे. उदा : ’OX’ म्हणजे ‘बैल’ ’box’ म्हणजे ‘पेटी’. ’a’ हे उपपद आहे हे सांगताना काही विद्यार्थी चुकले तर त्यांची चूक सुधारता येते व इतर विद्यार्थी त्यांचे अनुकरण, श्रवण करतात. a, e, o, u, i या पाचही स्वरांची ओळख या खेळातून मुलांना करून देता येते. विद्यार्थी अशा प्रकारचे शब्द तयार करून त्यांचे वाचन व अर्थ समजावून घेतात. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडते. विद्यार्थी अर्थपूर्ण शब्द तयार करण्याचा सराव करतात. शब्दांचा अर्थ समजावून घेतात व हे शब्द व त्यांचा अर्थ लक्षात ठेवण्यास चांगली मदत होते. यातून मुलांचा भाषा अभ्यास चांगला होतो.

-कल्पना आगवणे

svapp20162gmail.com