नमस्कार,
शिक्षणविवेक आयोजित उन्हाळी शिबिर कालपासून सुरु झाले. कालचा पहिला दिवस. पाळणाघरामुळे सगळी मुलं एकमेकांना ओळखतचं होती , पण मग त्यांनी सगळ्या ताईंना आपली ओळख करून देऊन आजच्या सत्राला सुरुवात झाली. पप्पडम्- पायसम्, सिग्नल, पोस्टमन या खेळांनी मुलांना खूप मजा आली. ' पुस्तक माझे ' या सत्रात मुलांनी स्वतः चे पुस्तक तयार केले. शिक्षणविवेकच्या कार्यकारी संपादक डॉ. अर्चना कुडतरकर यांनी हे सत्र घेतले. अर्चनाताईंच्या ' तुम्ही कोणते चित्रं काढणार? ' या प्रश्नावर सगळ्यांचा एकदम गलका सुरू झाला. पण त्यानंतर एक तासभर गडबड न करता मुलांनी आपापली पुस्तके तयार केली. स्वतःचे नाव लिहून प्रत्येकाने आपापल्या पुस्तकात काय लिहिले ते सांगितले. त्यांच्या वयानुसार त्यांनी तयार केलेली पुस्तके खरोखरच उत्तम होती. रुपाली निरगुडे, सायली शिगवण, राजश्री चव्हाण यांनी मुलांना मदत केली. आणि उद्या काय गंमत असेल याचा विचार करत छोटी मंडळी घरी गेली.

-प्रतिनिधी

[email protected]