साखरेची घनता

दिंनाक: 17 Apr 2018 11:16:12


राष्ट्रीय विज्ञानदिनानिमित्त शिक्षणविवेक आणि कुतुहूल यांच्या संयुक्त विद्यमाने विज्ञान नवसंकल्पना स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.  ५वी ते ७वी वयोगटातील द्वितीय क्रमांक आलेल्या आकांक्षा पतंगे आणि नेहा हारगी यांच्या साखरेची घनता या प्रयोगाविषयी माहिती घेऊ..

साहित्य- चार काचेचे ग्लास, साखर, पाणी, इसेन्स, २ चमचे, पोस्टर कलर, (निळा, हिरवा, नारंगी).

कृती- पहिल्यांदा तीन ग्लासमध्ये पाणी घ्या. आणि त्यामध्ये इन्सेस आणि कलर घाला. निळ्या रंगामध्ये दोन चमचे साखर आणि हिरव्या रंगामध्ये एक चमचा साखर घाला. नारंगी रंगामध्ये साखर घालू नका. आता ते नीट मिक्स करा. चौथा ग्लास घ्या त्यामध्ये निळा रंग चार चमचे घाला. हिरवा रंग चार चमचे घाला आणि नारंगी रंग चार चमचे घाला. (टिप- रंग हळुवारपणे चमच्यामार्फत ग्लासमध्ये घाला.

निरीक्षण- आता तुम्हाला असे दिसेल की, तीनही रंग एकमेकांत मिक्स न होता, ते एकमेकांवर तरंगताना दिसतात व त्या रंगाचे सुंदर थर तयार झालेला दिसतो यावरून असे लक्षात येते की, पाण्यातील साखरचे प्रमाण बदललेले की पाणी एकमेकांवर तरंगते यालाच साखरेची घनता असे म्हणतात.

 

आकांक्षा पतंगे, नेहा हारगी 

        ७ वी  

 MKSSS’S प्राथमिक शाळा,  शिशुविहार कर्वेनगर

 

५वी ते ७वी वयोगटातील प्रथम क्रमांक आलेल्या लौकिक भिंताडे याचा Water Cleaner याविषयीचा प्रयोग वाचा खालील लिंकवर 

WATER CLEANER