खाऊ करू , खाऊ खाऊ 

नमस्कार, आज शिबिराचा शेवटचा दिवस असूनही सगळे बालचमू उत्साही आणि आनंदी दिसत होते. आज प्रीती ताईंनी आल्याआल्या 'गंमत-जंमत' हे गाणे शिकवले. मुलांनी हे गाणे खूपच आवडीने म्हटले. आज शिबिरात काय करणार याची उत्सुकता सगळ्यांनाच होती. मुलांनी आज कांदा, बटाटा, टोमॅटो असे काही साहित्य आणले  होते. त्या साहित्याबद्दलची माहीती सांगायची होती. सगळे आठवून माहिती सांगत होते. गटात विभागणी केल्यानंतर सगळ्यांनी ताईंच्या मदतीने भेळ तयार केली. 'भेळ कशी तयार करायची' याची कृती मुलांनीच सांगितली.  कांदा, टोमॅटो, मुरमुरे, फरसाण, तिखट, मीठ, चिंचेचं पाणी एकत्र करून भेळ तयार केली. 
       आज 'बालक-पालक' हा एक विशेष उपक्रम होता. पालक आल्यावर रुपाली निरगुडे यांनी शिबीरात सत्र घेणाऱ्या सर्व ताईंचा परिचय करून दिला.  शिक्षणविवेकबद्दल  आणि शिक्षणविवेक प्रकाशित दोन गोष्टींच्या पुस्तकांची माहिती सांगितली. त्यानंतर शिक्षणविवेकच्या कार्यकारी संपादक डॉ.अर्चना कुडतरकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सगळ्या पालकांनी मुलांनी केलेल्या भेळीचा आस्वाद घेतला. मुलांनी सुद्धा खूप आवडीने भेळ खाल्ली. भेळ खाऊन झाल्यानंतर काही पालकांनी शिबिराबद्दल त्यांचं मनोगत व्यक्त केले. मुलांनीसुद्धा त्यांनी 'शिबिरात काय काय मज्जा केली', ते संगितले. मग सर्वांनी स्वा. सावरकर यांची विदेशी कपड्याच्या होळीचा एक लघुपट बघितला. ज्या पवित्र वास्तूत गेले ५ दिवस शिबिर चालले होते, त्या स्वा. सावरकर अध्यासन केंद्रास भेट देण्यात आली. सगळ्यानी 'वंदे मातरम', 'भारत माता की जय' अशा घोषणा दिल्या. सगळ्या मुलांना त्यांनी तयार केलेल्या वस्तूंची भेट देण्यात आली. सावरकर स्मारक पाहून झाल्यानंतर शिक्षणविवेक आयोजित उन्हाळी शिबिराची सांगता झाली.

शिक्षणविवेक आयोजित उन्हाळी शिबिरामध्ये चौथ्या दिवशी काय काय मजा केली? वाचा खालील लिंकवर

उन्हाळी शिबिर : दिवस चौथा (पूर्व - प्राथमिक)

 

- प्रतिनिधी 

[email protected]