शिबिरात आज चौपट मजा. शिक्षणविवेक आयोजित उन्हाळी शिबिरात आज चौथ्या दिवशी मुलांना भेटला चिंटू आणि त्याची बहीण मिनी पण. आज मुलांनी 'पपेट शो' पाहिला. गाण्यावर नाच करणारे पपेटस् पाहून मुलांना खूप आनंद झाला. शिक्षणविवेकच्या चित्रा नातू आणि रुपाली निरगुडे यांनी पपेटस्द्वारा गोष्टींचे सादरीकरण केले. चिंटू आणि मिनीची गोष्ट खूपच रंगात आली. चिंटू आणि मिनीचे भांडण, आईचा वाढदिवस, सर्वांनी मिळून केलेली कामे अशा गोष्टीतील घटना मुलांच्या लक्षात राहिल्या. आई,बाबा, चिंटू, मिनी, आजी, कासव, ससा, मनीमाऊ अशा अनेक पपेटस् आज मुलांनी पाहिल्या. गोष्टीनंतरचे 'चिऊ काऊ माऊ...' हे गीत मुलांना आवडले. टाळ्यांच्या तालावर गीत म्हणताना मुले छान रमली होती. त्यानंतर चित्रा नातू यांनी वेगवेगळी पपेटस् दाखवून मुलांना पपेटस् करायला शिकवले. प्रत्येकाच्या गोष्टीतली एकेएक पपेट तयार झाली. चित्राताईंनी मुलांकडून 'चिऊ काऊ माऊ...' हे  गीत म्हणवून घेतले. गीतातील लय सर्वांना आवडली त्यामुळे हेच गीत म्हणत म्हणत शिबिराचा आजचा दिवस सार्थकी लागला.

शिक्षणविवेक आयोजित उन्हाळी शिबिरामध्ये तिसऱ्या दिवशी काय काय मजा केली? वाचा खालील लिंकवर

उन्हाळी शिबिर : दिवस तिसरा (पूर्व- प्राथमिक)

 
-प्रतिनिधी